Join us

Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 09:54 IST

Stock Market Update: शेअर बाजारात आज फ्लॅट ट्रेडिंगला सुरुवात झाली. सेन्सेक्स १३१ अंकांनी वधारून ७९,३४३ वर उघडला. निफ्टी ३१ अंकांनी वधारून २४,०७० वर पोहोचला. बँ

Stock Market Update: शेअर बाजारात आज फ्लॅट ट्रेडिंगला सुरुवात झाली. सेन्सेक्स १३१ अंकांनी वधारून ७९,३४३ वर उघडला. निफ्टी ३१ अंकांनी वधारून २४,०७० वर पोहोचला. बँक निफ्टी ५४ अंकांनी वधारून ५४,६१० वर पोहोचला. तर रुपया ८५.४५ च्या तुलनेत ८५.३१/डॉलरवर उघडला. दुसरीकडे सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाले तर ऑटो आणि रियल्टी सेक्टर इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. तर आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली.

कामकाजादरम्यान, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक, सनफार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अल्ट्राटेक, एशियन पेंट्स, नेस्ले, मारुती, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम

टेक शेअर्सच्या जोरावर अमेरिकेच्या शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी दिसून आली. डाऊ जोन्स ४०० अंकांनी वधारल्यानंतर २० अंकांच्या वाढीसह दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. तर टेक्नॉलॉजी शेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे नॅसडॅकनं २१६ अंकांची जबरदस्त झेप घेतली. दुसरीकडे, गिफ्ट निफ्टी शतक झळकावत २४,२०० च्या वर बंद झाला. आशियाई बाजारही तेजीचे आहेत, निक्केईमध्ये २५० अंकांची तेजी दिसून आली.

कमॉडिटी बाजाराची स्थिती काय?

कमॉडिटी बाजारात सोन्या-चांदीवर दबाव कायम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी ५० डॉलरची घसरण झाल्यानंतर सोनं आता २,३२५ डॉलरच्या जवळ आलं. देशांतर्गत बाजारात सोनं ९०० रुपयांनी घसरून ९५,००० रुपयांवर बंद झालं, तर चांदी दीड टक्क्यांनी घसरून ९६,२०० रुपयांच्या खाली आली. कच्च्या तेलाचे दर स्थिर असून सध्या ते ६६ डॉलर प्रति बॅरलच्या खाली व्यवहार करत आहेत.

चीनकडून टॅरिफ वॉरवर दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, चीन अमेरिकेतील सेमीकंडक्टरसह काही उत्पादनांवर १२५ टक्क्यांपर्यंत शुल्क माफ करू शकतो, ज्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. शुक्रवारी बाजारात घसरण झाली असली तरी एफआयआय आणि देशांतर्गत फंडांनी खरेदी सुरूच ठेवली. एफआयआयनं सलग आठव्या दिवशी ३,८०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत फंडांनीही २,९५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

टॅग्स :शेअर बाजार