Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात सावध हालचाली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ घसरण; गुंतवणुकीपूर्वी तपासा आजचे टॉप गेनर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:35 IST

Indian Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार काहीसा मंदावला आहे. गुरुवारच्या रिकव्हरीनंतर नफाबुकींग होण्याची शक्यता आहे.

Indian Stock Market : शेअर बाजारात सलग काही दिवसांच्या चढ-उतारानंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर बाजारात सुरुवातीला कमजोरी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी लाल निशाणीत व्यवहार सुरू केला असला तरी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र काही प्रमाणात खरेदीचा ओघ कायम होता.

आजचे 'स्टार' शेअर्स आणि घसरलेले समभागआज फार्मा आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सनी बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, कोटक महिंद्रा बँक, जिओ फायनान्शियल, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक या शेअर्समध्ये तेजी दिसली. तर इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि एचडीएफसी लाईफ यांच्यात घसरण पाहायला मिळत आहे.

दिग्गज कंपन्यांचे रिपोर्ट कार्ड येणारआजचा दिवस कॉर्पोरेट क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कंपन्यांचा समावेश आहे. JSW स्टील, सिप्ला, श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक आणि भारत पेट्रोलियम. याशिवाय अदानी ग्रीन एनर्जी, गोदरेज कंझ्युमर, एमसीएक्स आणि लॉरस लॅब्स यांसारख्या कंपन्यांच्या कामगिरीकडेही विश्लेषकांचे लक्ष असेल.

वाचा - ६ कोटींचे पॅकेज अन् १० लाख 'पोटगी' टाळण्यासाठी सोडली नोकरी! भारतीय व्यक्तीला कोर्टाने शिकवला धडा

गुंतवणूकदारांसाठी आजचे महत्त्वाचे शेअर्सआजच्या सत्रात बंधन बँक, प्रीमियर एनर्जीज, डीएलएफ, गो डिजिट जनरल इन्शुरन्स आणि होम फर्स्ट फायनान्स या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळू शकतात. कंपन्यांच्या विशेष घोषणा आणि निकालांच्या अपेक्षेमुळे या शेअर्सवर नजर ठेवणे फायद्याचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cautious market moves; minor Sensex-Nifty dips, check top gainers today.

Web Summary : Indian stock market showed cautious trading. Pharma and IT shares recovered losses. Key companies like JSW Steel and Cipla will release quarterly results. Watch out for Bandhan Bank, DLF shares.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी