Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी! निफ्टी ५०० अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांच्या संपत्ती ११ लाख कोटींची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:11 IST

Stock Market Close Today: आजच्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, बाजारात केवळ किरकोळ वाढ दिसून येत नसून, तो सातत्याने वरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Stock Market Update : जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेत आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळण्याच्या आशेने भारतीय शेअर बाजारात आज 'दिवाळी' साजरी झाली. सकाळपासूनच खरेदीचा धडाका लावणाऱ्या गुंतवणूकदारांमुळेनिफ्टी-५० निर्देशांक दिवसाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. निफ्टीने सुमारे २.२५% म्हणजेच ५१६ अंकांची जोरदार झेप घेत २३,४२९ चा स्तर गाठला. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या शांतता चर्चेमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

तेजीची ५ प्रमुख कारणेशेअर बाजारातील या उसळीमागे जागतिक आणि तांत्रिक अशी पाच मोठी कारणे आहेत.

  1. सकारात्मक जागतिक संकेत : आशियाई बाजारपेठांमध्ये आज सुमारे १.४% ची तेजी पाहायला मिळाली. यामुळे भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा (FPI) आत्मविश्वास वाढला.
  2. ट्रम्प यांचा '१५-पॉइंट प्लॅन' : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमध्ये १५ कलमी कार्यक्रमावर चर्चा होत असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भूराजकीय तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  3. कच्च्या तेलाची 'शंभरी' खाली घसरण : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरले आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे भारतातील महागाईचा दबाव कमी होईल, हा कयास बाजारासाठी 'बूस्टर डोस' ठरला आहे.
  4. पुरवठा साखळीतील अडथळे दूर : जर युद्धविराम झाला, तर जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळी पुन्हा पूर्ववत होईल. याचा थेट फायदा कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईवर दिसून येईल.
  5. तांत्रिक मजबुती : जिओजित इन्व्हेस्टमेंटच्या मते, बाजार आता 'अपट्रेंड' मध्ये आहे. निफ्टीसाठी २३,३५० ते २३,८०० पर्यंतचे उद्दिष्ट दिसत असून, २२,८८० वर भक्कम खरेदीचा आधार आहे. जोपर्यंत बाजार २२,६४० च्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल कायम राहील.

वाचा - ट्रेडर्सना दुहेरी फटका! जेरोधाचे ब्रोकरेज दुप्पट, तर १ एप्रिलपासून 'STT' सुद्धा महागणार; पाहा काय बदलले?

गुंतवणूकदारांसाठी सल्ला"बाजार सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहे, तरीही उच्च स्तरावर गुंतवणूकदारांनी थोडी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. नफा वसुलीची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जेरोधासारख्या ब्रोकर्सनी वाढवलेले शुल्क आणि १ एप्रिलपासून लागू होणारा 'STT' कर पाहता, ट्रेडर्सनी आपले स्टॉप लॉस कडक ठेवणे हिताचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Roars Back! Nifty Soars, Investor Wealth Surges.

Web Summary : Indian stock market rebounded strongly amid positive global cues and easing geopolitical tensions. Nifty 50 surged by 516 points. Key factors include cooling crude oil prices, potential US-brokered ceasefire, and strong technical indicators, boosting investor confidence. Caution advised at higher levels.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी