शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी म्हणजे, यूएनओ मिंडा. या कंपनीच्या शेअरने साधारणपणे १२ वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना १७,७००% एवढा बंपर परतावा दिला आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये युनो मिंडाच्या शेअरची किंमत सुमारे ५ रुपये होती. गेल्या शुक्रवारी हा शेअर १०७१ रुपयांवर बंद झाला. या काळात, या शेअरने बोनसशिवाय १:१ आणि २:१ या प्रमाणात व्यवहार केला आहे.
शेअरची किंमत - आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात शुक्रवारी, शेअरची किंमत १०९७.९५ रुपयांवर पोहोचली होती. हा शेअर २.३८% ने घसरून १०७१.८० रुपयांवर क्लोज झाला. एप्रिल २०२५ मध्ये शेअरची किंमत ७६८.१० रुपये होती, हा शेअरच्य ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तर शेअरच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १२५२.८५ रुपये एवढा आहे.