Join us

Stock Market News: किरकोळ घसरणीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; Bharti Airtel, Nestle India मध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:49 IST

Share Market News : सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात (३० डिसेंबर) किरकोळ घसरणीसह झाली आहे. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले.

Share Market News : सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात (३० डिसेंबर) किरकोळ घसरणीसह झाली आहे. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले, त्यानंतर घसरण किंचित कमी होताना दिसली. व्यवहार सुरू झाल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. अदानी एंटरप्रायझेस अडीच टक्क्यांनी वधारला. अदानी पोर्ट्समध्येही ०.७३ टक्क्यांची वाढ झाली. निफ्टीवर भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. दरम्यान, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, बीपीसीएल यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

जागतिक बाजारातून आज कमकुवत संकेत मिळत आहेत. प्री-ओपनिंगमध्ये बाजारात घसरण दिसून आली असून शेअर बाजार किंचित घसरण होऊन सुरू होण्याची चिन्हं होती. हा वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. अशा परिस्थितीत बाजारात काही चढउतार होऊ शकतात.

जागतिक बाजाराचे अपडेट्स

अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमेरिकी बाजार घसरणीसह बंद झाले. सलग ५ दिवस तेजी दिसल्यानंतर टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्यानं डाऊ साडेतीनशे अंकांनी घसरला, तर नॅसडॅक ३०० अंकांनी घसरला. डाऊ फ्युचर्स ७० अंकांनी तर निक्केई ३०० अंकांनी घसरला. 

कच्च्या तेलाचा भाव एक टक्का वाढून ७४ डॉलरवर पोहोचला. सोनं १५ डॉलर्सनं घसरून २६४० डॉलर्सवर तर चांदी दीड टक्क्यांनी घसरून ३० डॉलरवर आली. देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव ३५०० रुपयांनी घसरून ८८,९०० रुपयांच्या खाली आला. दुसरीकडे, रुपयाची घसरण आणि एफआयआयच्या विक्रीमुळे देशाचा परकीय चलन साठा ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. २० डिसेंबरच्या आठवड्यात तो ६५३ अब्ज डॉलरवरून ६४४ अब्ज डॉलरवर घसरला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक