Join us

Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरूवात, ५५० अंकांनी सेन्सेक्स वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:44 IST

Stock Markets Today: सर्वत्रच चौफेर तेजीचे संकेत मिळत असताना गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्स ५९५ ...

Stock Markets Today: सर्वत्रच चौफेर तेजीचे संकेत मिळत असताना गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्स ५९५ अंकांनी वधारून ७७,३१९ वर उघडला. निफ्टी १६४ अंकांनी वधारून २३,३७७ वर आणि बँक निफ्टी ३३१ अंकांनी वधारून ४९,०८२ वर उघडला. मिडकॅप निर्देशांक सुमारे ७५० अंकांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांक २५० अंकांनी वधारला. 

निफ्टीवर एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्राइझ, एसबीआय लाइफ, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर एचयूएल, आयटीसी, टाटा कन्झ्युमर, डॉ. रेड्डी, सिप्ला यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. म्हणजेच एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण झाली.

आज सकाळी निफ्टी १४८ अंकांनी वधारून २३,४१४ वर होता. अमेरिकेच्या फ्युचर्समध्ये किंचित तेजी दिसून आली. निक्केई २५० अंकांनी वधारला. कालच्या तेजीमध्येही एफआयआयनं देशांतर्गत खरेदी-विक्री सुरूच ठेवली. एफआयआयनं सलग २१ व्या दिवशी ४५०० कोटी रुपयांच्या रोख रकमेसह नेट २६८२ कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत फंडांनी ३७०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक