Stock Market Today: गुरुवारी (२१ ऑगस्ट) देशांतर्गत शेअर बाजार सकारात्मक सुरुवात झाली. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, निफ्टी देखील ५० अंकांनी वधारला. बँक निफ्टी ८० अंकांनी वधारला. निफ्टीवर एनबीएफसी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. रियल्टी आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्येही खरेदी झाली. ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. मीडिया, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री दिसून आली.
निफ्टीमध्ये बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, रिलायन्स, टाटा मोटर्स हे सर्वाधिक वधारलेले शेअर होते. तर इटर्नल, एचयूएल, टाटा कंझ्युमर, नेस्ले, इन्फोसिस हे सर्वाधिक घसरले.
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ झाली. निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, त्यामुळे बाजारात हालचाल दिसून येईल. तथापि, प्री-ओपनिंगमध्ये, बाजाराची सुरुवात वाढीनं होण्याची चिन्हे होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदीला कोणताही पाठिंबा नाही, त्यामुळे बाजारात मजबूत भावना निर्माण होताना दिसत नाहीत.
अमेरिकन बाजार सुस्त
बुधवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. डाउ जोन्स दिवसाच्या नीचांकी पातळीपासून १७० अंकांनी सावरला, परंतु शेवटी तो फक्त १६ अंकांनी वाढू शकला. दुसरीकडे, टेक शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार विक्री झाली, ज्यामुळे नॅस्डॅक सुमारे १५० अंकांनी घसरून बंद झाला.