Stock Market Today: आज कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेमुळे, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही आज वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ७१८ अंकांनी वाढून ८१,३१५ वर उघडला. निफ्टी ३०७ अंकांनी वाढून २४,९३८ वर उघडला. बँक निफ्टी ५९९ अंकांनी घसरून ५५,९४० वर उघडला. रुपया ८७.५५ च्या तुलनेत ८७.४६/डॉलरवर उघडला. शेअर बाजारातील या सततच्या वाढीचा परिणाम क्षेत्रीय निर्देशांकावरही दिसून आला आहे. निफ्टी ऑटो सुमारे ३ टक्क्यांनी वाढीसह व्यवहार करत आहे. फार्मा, मेटल, आयटी आणि रिअल्टी क्षेत्रांच्या बाबतीतही असंच चित्र आहे. जवळजवळ सर्व निर्देशांक १ टक्क्यांनी वाढीसह व्यवहार करत आहेत.
या शेअर्समध्ये तेजी/घसरण
कामकाजादरम्यान मारुती, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टीसीएस, सनफार्मा, आयटीसी, एल अँड टी, एचसीएल टेक यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
मोदींनी केलेली घोषणा
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था आणि स्वावलंबी भारतासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये मोठी कपात करण्याचे संकेत त्यांनी दिले, मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स लाँच करण्याचं आश्वासनही दिलं आणि संरक्षण क्षेत्रात 'सुदर्शन चक्र मिशन'ची घोषणा केली. येत्या काही महिन्यांत सरकारचं लक्ष उत्पादन, औषध संशोधन आणि ऊर्जा सुरक्षेवर असेल असंही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. या घोषणांचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आणि गिफ्ट निफ्टीनं जोरदार वाढ नोंदवली.