Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 504, तर निफ्टी 156 अंकांनी वधारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:38 IST

सेन्सेक्स 504.86 अंकांनी (0.65%) वाढून 78,493.54 वर बंद झाला.

Stock Market Closing Today: आज(दि. 17) आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ झाली. निफ्टी 50 156.80 अंकांच्या वाढीसह 24,353.55 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 504.86 अंकांनी (0.65%) वाढून 78,493.54 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

टॉप गेनर्स आणि लूझर्स

आजच्या ट्रेडिंगमध्ये Hindustan Unilever हा 4.7% वाढीसह सर्वाधिक वाढणारा शेअर ठरला. तर, त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड 1.73% वाढ, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, रिलायन्स, कोटक बँक, आयटीसी, मारुती, BEL 1% वाढले. तर दुसरीकडे, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आशियाई बाजार

जपान (Nikkei 225): 0.7% घसरणदक्षिण कोरिया (Kospi): 0.43% घसरणहाँगकाँग: कमकुवत सुरुवातीचे संकेत

अमेरिकन बाजार

डॉव जोन्स: 0.24% वाढS&P 500: 0.26% वाढNasdaq: 0.36% वाढ

इतर महत्त्वाच्या घडामोडी

Wipro Q4 निकाल

महसूल: ₹24,017 कोटी (QoQ 2.73% वाढ)EBIT: ₹4,155 कोटीशेअर बायबॅक: ₹15,000 कोटी (₹250 प्रति शेअर)

कमोडिटी अपडेट

कच्चे तेल: घसरण (ब्रेंट ~$98 प्रति बॅरल)सोने: किंचित वाढ

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Stock market surges: Sensex up 504, Nifty gains 156 points.

Web Summary : Indian stock market witnessed a positive trading day. Sensex climbed 504 points, closing at 78,493. Nifty rose 156 points to 24,353. Hindustan Unilever was the top gainer. Asian markets showed mixed signals, while US markets saw slight gains. Wipro announced its Q4 results and a share buyback.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक