Join us

Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात, Nifty ६० अंकांनी घसरला; IT Stocks आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:03 IST

Stock Market Today: निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी गुरुवारी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली.

Stock Market Today: निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी गुरुवारी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स १८२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही ६० अंकांनी घसरला. बँक निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होता. निर्देशांक ५० अंकांनी वधारला. मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांक ७०० अंकांनी घसरला. सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये नोंदवण्यात आली.

आज निफ्टी ५० वर विप्रो सर्वाधिक घसरला. आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, अपोलो हॉस्पिटल, एचडीएफसी बँक यांचे शेअर्स निफ्टीत सर्वाधिक वधारले. तर विप्रो, एचसीएल टेक, हीरो मोटो, कोल इंडिया, टाटा स्टील, टेक महिंद्रा या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.

मागील बंद भावाच्या तुलनेत ओपनिंग लेव्हलवर नजर टाकली तर सेन्सेक्स ७६ अंकांनी घसरून ७६,९६८ वर उघडला. निफ्टी ३६ अंकांनी घसरून २३,४०१ वर बंद झाला. बँक निफ्टी ५३ अंकांनी वधारून ५३,१५३ वर आणि रुपया २० पैशांनी मजबूत होऊन ८५.४८/डॉलरवर खुला झाला.

ग्लोबल मार्केट्सचे अपडेट्स

टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेतील महागाईची चिंता वाढत आहे. अशा तऱ्हेनं त्याचा स्पष्ट परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. बुधवारी वॉल स्ट्रीटवर मोठी उलथापालथ झाली. खरं तर फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी वाढती महागाई आणि अमेरिका मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जोपर्यंत शुल्क धोरण स्पष्ट होत नाही तोपर्यंत व्याजदरात कपात न करण्याचं संकेत त्यांनी दिलं आहेत. अशा तऱ्हेनं फेडची चिंता आणि टेक शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे काल अमेरिकी बाजारात घसरण झाली. १००० अंकांच्या उलथापालथीदरम्यान डाओमध्ये ७०० अंकांची घसरण झाली, तर नॅसडॅकमध्ये ५०० अंकांची मोठी घसरण नोंदवली. आज सकाळी गिफ्ट निफ्टी ४५ अंकांनी घसरून २३,३९३ वर बंद झाला. डाऊ फ्युचर्स २०० अंकांनी वधारला तर निक्केई २०० अंकांनी वधारला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक