Join us

Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:26 IST

Share Market Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात तेजीनं झाली, त्यानंतर प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवत स्थिर व्यवहार सुरू केला.

Share Market Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात तेजीनं झाली, त्यानंतर प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवत स्थिर व्यवहार सुरू केला. सेन्सेक्स २०० अंकांपेक्षा जास्त वाढून ८१,९८७ वर व्यवहार करत होता. निफ्टी ६० अंकांनी वाढून २५,१०० च्या वर होता. मेटल, आयटी आणि औषधनिर्माण क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. दरम्यान, एनबीएफसी, एफएमसीजी आणि कन्झुमर ड्युरेबल्सचे शेअर्स कमकुवत दिसत होते.

निफ्टी ५० मध्ये टाटा स्टील, डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, इटरनल आणि अदानी एंटरप्रायझेस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, मॅक्स हेल्थ, टायटन, आयशर मोटर्स आणि कोटक बँक हे सर्वाधिक घसरले.

भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख

या आठवड्यात जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड उलाढाल दिसून आली. मौल्यवान धातूंनी इतिहास रचला आहे, तर अमेरिकन बाजारपेठेत तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाली आहे. दरम्यान, भारतातील निकालांचा हंगाम आजपासून सुरू होत आहे, ज्याची सुरुवात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या निकालांनी होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Opens Green; Nifty Above 25,000; Cipla, Zomato Gain

Web Summary : Indian stock markets started strong, with the Sensex and Nifty rising. Metal, IT, and pharma stocks led gains. Tata Steel, Dr. Reddy's, and HCL Tech performed well, while Power Grid and Bajaj Finance declined. The earnings season begins with TCS results.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक