Join us

Stock Market Today: शेअर बाजाराची शांत सुरुवात, निफ्टीनं २३,२०० ची लेव्हल केली होल्ड; ऑटो-फार्मा शेअर्सवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:43 IST

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात अतिशय शांतपणे झाली. बेंचमार्क निर्देशांक लाल आणि हिरव्या चिन्हादरम्यान फिरताना दिसले.

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात अतिशय शांतपणे झाली. बेंचमार्क निर्देशांक लाल आणि हिरव्या चिन्हादरम्यान फिरताना दिसले, त्यानंतर त्यात किंचित वाढ झाली. सेन्सेक्स ३२ अंकांनी वधारून ७६,५५२ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी सुमारे २० अंकांच्या वाढीसह २३,२२० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी ७० अंकांच्या घसरणीसह ४८,५२० वर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांकात किंचित खरेदी दिसून आली. कामकाजादरम्यान ऑटो आणि फार्मा शेअर्सवर दबाव दिसून आला.

गुरुवारी अमेरिकेच्या बाजारात तेजी होती. सकाळी अमेरिकन फ्युचर्सही ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत होते. गिफ्ट निफ्टी ४९ अंकांच्या वाढीसह २३,३१३ च्या पातळीवर व्यवहार करत होता. निक्केईमध्ये २०० अंकांची वाढ दिसून आली.

खरं तर काल डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून फेडरल रिझर्व्हवर दर कमी करण्यासाठी दबाव आणला, त्यानंतर सौदी आणि ओपेकला कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याचं आवाहन केलं. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या बाजारानं सलग चौथ्या दिवशी उसळी घेतली आणि दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. एस अँड पी ५०० नं सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक गाठला. डाऊ ४०० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक ४५ अंकांनी वधारला.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

कमॉडिटी मार्केटबद्दल बोलायचं झालं तर कच्च्या तेलाचा भाव सलग सहाव्या दिवशी घसरणीसह दीड टक्क्यांनी घसरून ७८ डॉलरच्या खाली आला. सोनं २७६५ डॉलरवर तर चांदी ३१ डॉलरच्या आसपास किरकोळ घसरणीसह स्थिरावली होती.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक