Stock Market Today: बुधवारी शेअर बाजारानं ग्रीन झोनमध्ये सुरुवात केली, परंतु प्रमुख बेंचमार्क निर्देशांकात रेड आणि ग्रीन झोनदरम्यान दरम्यान चढउतार करताना दिसला. निफ्टी २५,८५० च्या जवळ व्यवहार करताना दिसला, ज्यात थोडीशी वाढ झाली. ऑटो आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली. मीडिया निर्देशांक वगळता जवळजवळ सर्वच निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.
निफ्टी ५० वर, हिंडाल्को, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, ट्रेंट, कोटक बँक, टाटा स्टील हे सर्वात जास्त वधारले. तर, इंडिगोमध्ये १.७% सह सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय, एसबीआय लाईफ, टायटन, भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ, टाटा कंझ्युमर यामध्ये देखील मोठी घसरण झाली.
सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ५९ अंकांनी घसरून ८४,६०७ वर उघडला. निफ्टी २५ अंकांनी वाढून २५,८६४ वर उघडला. बँक निफ्टी ५९ अंकांनी वाढून ५९,२८१ वर उघडला. चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया ९०.०३/डॉलर्स वर आला.
भारत-अमेरिका ट्रेड डायलॉग
व्यापार करार वाटाघाटी पुढे नेण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ भारतात आलं आहे. ही तीन दिवसांची उच्चस्तरीय बैठक आजपासून १२ डिसेंबरपर्यंत चालेल. दोन्ही देशांमधील व्यापार सहकार्य आणि गुंतवणूकीसंदर्भात महत्त्वाच्या चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
७२ व्या सलग दिवशी DII खरेदीदार
परदेशी गुंतवणूकदार सलग नऊ दिवस विक्रेते राहिले आहेत. सोमवारी, एफआयआयनं रोख बाजारात ₹३,७६० कोटींची निव्वळ विक्री केली, ज्यामध्ये ₹३,१५५ कोटींची निव्वळ विक्री झाली. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ₹६,२२५ कोटींची महत्त्वपूर्ण खरेदी केली, ज्यामुळे त्यांचा ७२ दिवसांची विक्रमी खरेदी सुरू राहिली. मजबूत देशांतर्गत गुंतवणूकीमुळे बाजाराला आधार मिळाला आहे.
Web Summary : Indian stock market started positively, with auto and realty sectors leading gains. Nifty traded near 25,800. DII buying supports market as FIIs remain sellers. US-India trade talks begin.
Web Summary : भारतीय शेयर बाजार की शुरुआत सकारात्मक रही, ऑटो और रियलिटी सेक्टर में तेजी रही। निफ्टी 25,800 के करीब कारोबार कर रहा था। एफआईआई की बिक्री के बीच डीआईआई की खरीदारी से बाजार को समर्थन मिला। अमेरिका-भारत व्यापार वार्ता शुरू।