Join us

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:14 IST

Stock Market Today: गुरुवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीनंतर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. यानंतर सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये घसरताना दिसला.

Stock Market Today: गुरुवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीनंतर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. यानंतर सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये घसरताना दिसला. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ५७ अंकांनी वधारून ८१,३८८ वर होता. तर निफ्टी १५ अंकांनी वधारून २४,६८२ च्या पातळीवर होता. बँक निफ्टी ७७ अंकांनी वधारून ५४,८७८ च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी मिडकॅप निर्देशांक १०० १९६ अंकांनी वधारून ५६,३३३ च्या पातळीवर होता.

पण त्यानंतर शेअर रेड झोनमध्ये आला. निफ्टी २४,५८४ च्या नीचांकी पातळीवर गेला. तर सेन्सेक्स ८१,०४४ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स, फार्मा इंडेक्स, प्रायव्हेट बँक, रियल्टी या निर्देशांकांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली. निफ्टीवर जेएसडब्ल्यू स्टील, हीरो मोटोकॉर्प, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटोमध्ये तेजी दिसून आली. तर पॉवर ग्रिड, ओएनजीसी, कोटक बँक, डॉ. रेड्डी, एसबीआय लाईफ यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

FD वर व्याज झालं कमी, पोस्टाच्या ही स्कीम देतेय जबरदस्त परतावा; ₹१००००० आणि ₹२००००० वर किती रिटर्न मिळणार

जागतिक बाजारातून आज किंचित संमिश्र संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी २५ अंकांनी वधारला होता. काल अमेरिकेच्या बाजारात डाऊ आणि नॅसडॅक पुन्हा वेगवेगळ्या दिशेनं गेल्याचं दिसून आलं. सलग दुसऱ्या दिवशी डाऊ १०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक सलग सहाव्या दिवशी जवळपास १५० अंकांनी वधारला. गिफ्ट निफ्टी जवळपास २५ अंकांनी वधारून २४,७४० च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स १५० अंकांनी घसरले. निक्केई ४०० अंकांनी घसरला होता.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक