Join us

Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:52 IST

Stock Market Today: आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये ३२७ अंकांनी वाढ होऊन ८२,५२७ वर व्यवहार सुरू केला.

Stock Market Today: आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये ३२७ अंकांनी वाढ होऊन ८२,५२७ वर व्यवहार सुरू केला. सुरुवातीच्या व्यवहारात इटरनलच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची वाढ दिसून आली. निफ्टी ७६ अंकांनी मजबूत होऊन २५,१६६ वर उघडला. बँक निफ्टी ३०१ अंकांनी वाढून ५७,२५३ वर उघडला. रुपया ८ पैशांनी कमकुवत होऊन ८६.२६/डॉलर्स वर उघडला. क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचं झाले तर, ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. त्याच वेळी, मेटल, बँक आणि रिअल्टी क्षेत्रं गुंतवणूकदारांचं आवडते क्षेत्र राहिलंय. यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येतेय.

कामकाजादरम्यान इटर्नल, ट्रेंट, टाटा स्टील, टायटन आणि बीईएलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे सनफार्मा, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेत सध्या विश्रांती आहे. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी कोणताही ठोस निकाल लागण्याची शक्यता आता कमी आहे. चर्चेचा सहावा टप्पा आता ऑगस्टमध्ये भारतात होणार आहे, ज्यामध्ये अमेरिकेची टीम सहभागी होईल. दोन्ही देशांमध्ये शुल्क सवलत, डिजिटल व्यापार आणि कृषी आयातीबाबत चर्चा सुरू आहे. काल एफआयआयचा विक्रीचा दबाव काहीसा कमी झाला. त्यांनी ₹१४०० कोटींची निव्वळ विक्री केली, जी अलिकडच्या काळातील सर्वात कमी विक्री आहे. याउलट, देशांतर्गत फंडांनी (DIIs) ₹३,६०० कोटींची गुंतवणूक केली, जी जवळजवळ एका महिन्यातील सर्वात मोठी खरेदी आहे. यामुळे, दिवसाच्या दुसऱ्या सहामाहीत बाजारात जोरदार सुधारणा दिसून आली.

अमेरिकन बाजारांचा विक्रम पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित केला

अमेरिकन बाजारपेठेत, नॅस्डॅकनं सलग सहाव्या दिवशी ८० अंकांची वाढ नोंदवत आतापर्यंतचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, S&P 500 नं देखील एका नवीन विक्रमाला स्पर्श केला. तथापि, डाऊ जोन्स दिवसाच्या उच्चांकापेक्षा ३०० अंकांनी खाली स्थिरावला. यावरून असे दिसून येते की टेक स्टॉक्समधील उत्साह कायम आहे, परंतु जुन्या इकॉनॉमी स्टॉक्सवर दबाव कायम आहे. गिफ्ट निफ्टी ६० अंकांच्या वाढीसह २५२०० च्या जवळ व्यवहार करत आहे, जे देशांतर्गत बाजारांची मजबूत सुरुवात दर्शवतं. त्याच वेळी, डाऊ फ्युचर्स देखील ७५ अंकांनी वधारले आहेत आणि निक्केई १७५ अंकांनी मजबूत आहे, ज्यामुळे जागतिक ट्रेंड सकारात्मक होत आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक