Join us

Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित रिकव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 09:44 IST

Stock Market Today: २४ फेब्रुवारीला झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज बाजारात किंचित सुधारणा झाली आहे. सेन्सेक्स १४ अंकांनी घसरून ७४,४४० वर आला.

Stock Market Today: २४ फेब्रुवारीला झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज बाजारात किंचित सुधारणा झाली आहे. सेन्सेक्स १४ अंकांनी घसरून ७४,४४० वर आला. निफ्टी ३७ अंकांनी घसरून २२,५१६ वर उघडला. तर बँक निफ्टी ४० अंकांनी वधारून ४८,६९१ वर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी सध्या सपाट व्यवहार करत आहेत. 

रुपयाबद्दल बोलायचं झालं तर तो १५ पैशांनी घसरून ८६.८५/ डॉलरवर उघडला. चांगली बाब म्हणजे आज निफ्टी ऑटो, एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रात तेजी दिसून आली आहे. तर निफ्टी, फार्मा, मेटल आणि आयटी सेक्टरवर दबाव दिसत आहे. आज निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक विक्री होताना दिसत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात यात १.३५ टक्क्यांची घसरण दिसून आली.

यामध्ये तेजी /  घसरण

कामकाजाच्या सुरुवातीला महिंद्रा अँड महिंद्रा, झोमॅटो, मारुती, नेस्ले, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे सनफार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, एल अँड टी यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

अमेरिकेच्या बाजारात मंगळवारी चढ-उतार पाहायला मिळाले. डाऊ जोन्स २५० अंकांच्या घसरणीनंतर केवळ ३५ अंकांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला, तर नॅसडॅक २५० अंकांनी घसरून सलग तिसऱ्या दिवशी दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. एस अँड पी ५०० वरही दबाव कायम होता. दरम्यान, आशियाई बाजारात घसरण दिसून आली असून जपानचा निक्केई निर्देशांक ३५० अंकांनी घसरला.

ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी तणाव 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर पुढील महिन्यापासून २५ टक्के कर लादण्याचे संकेत दिले आहेत. हे शुल्क वेळेवर लागू केलं जाईल, ज्याचा परिणाम अमेरिकेच्या व्यापार संबंधांवर होऊ शकतो, असं ते म्हणाले.

टॅग्स :शेअर बाजार