Join us

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरुच; सेन्सेक्स ९४ अंकांच्या घसरणीसह उघडला, FMGC सेक्टरमध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:59 IST

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स ९४ अंकांनी घसरून ८१,४५७ वर खुला झाला.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स ९४ अंकांनी घसरून ८१,४५७ वर खुला झाला. निफ्टी ६ अंकांनी वधारून २४,८३२ वर उघडला. बँक निफ्टी २४ अंकांच्या घसरणीसह ५५,३२८ वर उघडला.

मात्र, आज सेक्टोरल इंडेक्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. एफएमसीजी निर्देशांक वगळता जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली. एफएमसीजीमध्ये आज १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कामकाजादरम्यान इन्फोसिस, एचसीएलटेक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे एल अँड टी, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, टायटन आणि आयटीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली.

पॅन केवळ १० अक्षरं नाही तर तुमची आर्थिक कुंडली आहे; प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान

अमेरिकन बाजारात तेजी

युरोपियन युनियनवर कर लादण्याचं संकट टळल्यानं मंगळवारी अमेरिकी बाजारात जोरदार तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आणि डाऊ जोन्समध्ये ७५० अंकांची जबरदस्त तेजी दिसून आली. नॅसडॅकमध्येही ४५० अंकांची वाढ झाली. गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं होत असलेल्या घसरणीनंतर ही तेजी आल्यानं बाजारानं सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, डाऊ फ्युचर्स आता सुस्त दिसत आहेत. आशियाई बाजारांबद्दल बोलायचं झाले तर जपानचा निक्केई निर्देशांक २२५ अंकांनी वधारला, तर गिफ्ट निफ्टी २४,८५० च्या जवळ सपाट होता.

टॅग्स :शेअर बाजार