Join us

Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:11 IST

Stock Market Today: शेअर बाजारात आज थोडी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ९३ अंकांनी वधारून ८३,७९० वर उघडला. निफ्टी ४७ अंकांनी वधारून २५,५८८ वर पोहोचला.

Stock Market Today: शेअर बाजारात आज थोडी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ९३ अंकांनी वधारून ८३,७९० वर उघडला. निफ्टी ४७ अंकांनी वधारून २५,५८८ वर पोहोचला. बँक निफ्टी ९९ अंकांनी वधारून ५७,५५८ वर पोहोचला. तर दुसरीकडे रुपया ८५.५२ च्या तुलनेत ८६.५८/डॉलरवर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आज आयटी इंडेक्समध्ये १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. मात्र, मेटल आणि फार्मा क्षेत्रातही तेजी दिसून येत आहे. 

कामकाजादरम्यान इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, टाटा मोटर्स, सनफार्माच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे बीईएल, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह आणि एशियन पेन्ट्सच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल

सलग दोन दिवस नवीन उच्चांक गाठल्यानंतर, मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारांमध्ये चढउतार दिसून आले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ४०० अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि सलग चौथ्या दिवशीही तो मजबूत राहिली. दरम्यान, नॅस्डॅकमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आलं आणि तो सुमारे १७० अंकांनी घसरला. या घसरणीचं कारण टेक स्टॉक्समध्ये मोठी विक्री होती. तर दुसरीकडे एस अँड पी ५०० देखील किंचित घसरणीसह बंद झाला.

फेड अध्यक्षांच्या वक्तव्यावर ट्रम्प यांची टीका

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणांना व्याजदरात कपात न केल्याचा ठपका ठेवला. ते म्हणाले की, जर हे शुल्क लागू झालं नसतं तर फेडनं आतापर्यंत दरात कपात केली असती. ट्रम्प यांच्या पुनरागमनाची शक्यता आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे बाजारात खळबळ उडाली आहे. भारतीय बाजारासाठी सुरुवातीचे संकेत संमिश्र आहेत. गिफ्ट निफ्टी जवळपास ५० अंकांच्या वाढीसह २५,७०० च्या जवळ व्यवहार करत आहे. सध्या डाऊ फ्युचर्स फ्लॅट आहेत, तर जपानचा निक्केई ३०० अंकांनी घसरला आहे.

टॅग्स :शेअर बाजार