Stock Market Today: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बाजार ग्रीन झोनमध्ये खुला झाला. सेन्सेक्स १७८ अंकांनी वधारून ८०,३९६ वर उघडला. निफ्टी ४२ अंकांनी वधारून २४,३७० वर पोहोचला. बँक निफ्टी ९२ अंकांनी वधारून ५५,५२४ वर आला. दुसरीकडे, सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर, पीएसयू बँकेनं आज सुरुवातीच्या व्यवहारात १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहिली. निफ्टी एफएमसीजी वगळता इतर सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत.
कामकाजादरम्यान इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, रिलायन्स आणि स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. तर दुसरीकडे मारुती, नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड, बजाज फायनान्स आणि सनफार्माच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
प्रचंड अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अमेरिकी बाजारात तेजी दिसून आली. डाऊ जोन्स सलग पाचव्या दिवशी ११४ अंकांनी वधारला, तर नॅसडॅक १६ अंकांनी घसरून बंद झाला. दरम्यान, गिफ्ट निफ्टी २४,४५० च्या आसपास स्थिरावला, तर डाऊ फ्युचर्समध्ये जवळपास ५० अंकांची वाढ दिसून आली. जपानमधील बाजारपेठा आज सुट्टीनिमित्त बंद आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी भारतासोबतच्या व्यापार कराराबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. अमेरिकेसोबत व्यापार करार करणारा भारत पहिला देश ठरू शकतो, ज्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे, असं ते म्हणाले.
सोमवारी जोरदार खरेदी
विदेशी गुंतवणूकदार (FII) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सलग नवव्या दिवशी ९,९०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर डीआयआयनं २,८०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. कॅश फ्लो कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) मे महिन्यात चार टप्प्यांत एकूण सव्वा लाख कोटी रुपयांचे रोखे खरेदी करण्याची घोषणा केली आहे. पहिली ५०,००० कोटींचं ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ) ६ मे रोजी होणार आहे.