Join us

Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:54 IST

Stock Market Today: शेअर बाजारात आजही सुरुवातीच्या व्यवहारात मोठी हालचाल दिसून आलेली नाही. सेन्सेक्स २० अंकांनी घसरून ८२,२३३ वर उघडला.

Stock Market Today: शेअर बाजारात आजही सुरुवातीच्या व्यवहारात मोठी हालचाल दिसून आलेली नाही. सेन्सेक्स २० अंकांनी घसरून ८२,२३३ वर उघडला. निफ्टी ७ अंकांनी वधारून २५,०८९ वर पोहोचला. बँक निफ्टी ५६ अंकांनी घसरून ५६,७०९ वर उघडला. रुपया ८५.९९ च्या तुलनेत ८५.९७ रुपये प्रति डॉलरवर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर ऑटो, मीडिया आणि रियल्टी निर्देशांकात मोठी वाढ दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवसायात आयटीमध्ये किरकोळ विक्री झाली. पण त्यानंतर तो ग्रीन झोनमध्ये व्यवसायही करताना दिसला. त्याचा परिणाम सेन्सेक्सवरही दिसून आला. काही काळानंतर सेन्सेक्स १०० अंकांपेक्षा मजबूत दिसला.

कामकाजादरम्यान सनफार्मा, बीईएल, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अॅक्सिस बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, इटर्नल आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम

तेजीचं हे देखील एक कारण

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. जून महिन्यात किरकोळ महागाई दर (CPI) २.१% पर्यंत खाली आला आहे, जो गेल्या साडेसहा वर्षातील सर्वात कमी पातळी आहे. अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. महागाईतील या मंदीमुळे व्याजदरांवर परिणाम होऊ शकतो तसंच सामान्य माणसाच्या बजेटमध्ये दिलासा मिळू शकतो.

जागतिक बाजारातून सेन्सेक्सला बळ

भारत आणि अमेरिकेतील संभाव्य व्यापार कराराबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय की हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल. या संदर्भात, भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात पुन्हा एकदा अमेरिकेत पोहोचले आहे, जिथे या कराराला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) काल सलग दुसऱ्या दिवशी विक्री केली आणि ५,१५० कोटी रुपयांचे शेअर्स विकले, ते मागील सत्राच्या तुलनेत जवळजवळ निम्मे होते. दुसरीकडे, देशांतर्गत फंडांनी सहाव्या दिवशीही खरेदी सुरू ठेवली आणि सुमारे १,८०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. यामुळे बाजार स्थिर राहिला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक