Join us

Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:57 IST

Stock Market Today: शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स ७९ अंकांनी वाढून ८३,६८५ वर उघडला. निफ्टी ३४ अंकांनी वाढून २५,५५१ वर पोहोचला.

Stock Market Today: शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स ७९ अंकांनी वाढून ८३,६८५ वर उघडला. निफ्टी ३४ अंकांनी वाढून २५,५५१ वर पोहोचला. बँक निफ्टी ६३ अंकांनी वाढून ५७,३७५ वर उघडला. तर दुसरीकडे रुपया ९ पैशांनी मजबूत होऊन ८५.५९ वर उघडला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑटो आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. दरम्यान, आजच्या सुरुवातीच्या सत्रात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जवळजवळ सर्व निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत.

कामकाजादरम्यान एशियन पेंट्स, रिलायन्स, बीईएल, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, सनफार्मा, इटर्नल, ट्रेंट आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं

अमेरिकन शेअर बाजारांनी काल नवीन उंची गाठली. नॅस्डॅक १०० अंकांनी आणि एस अँड पी ५०० मध्ये जवळपास अर्ध्या टक्क्यांनी वाढ होऊन सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. डाऊ जोन्स सलग तिसऱ्या दिवशी २७५ अंकांनी वधारला. आज सकाळी डाऊ फ्युचर्समध्येही ५० अंकांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गिफ्ट निफ्टी जवळजवळ ५० अंकांनी वाढून २५,६५० च्या जवळ पोहोचला आहे, जो बाजारात सकारात्मक संकेत देत आहे. दरम्यान, आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून येत आहेत, जपानचा निक्केई निर्देशांक ३७५ अंकांनी घसरला होता.

डॉलर निर्देशांक घसरला, सोने-चांदीत मोठी वाढ

डॉलर निर्देशांक सलग सहाव्या दिवशी घसरला आणि साडेतीन वर्षांतील नीचांकी स्तर ९६.३० पर्यंत घसरला. या कमकुवतपणाचा फायदा घेत सोनं ५० डॉलरनं वधारून ३३२५ डॉलरवर पोहोचलं. चांदीही एका टक्क्यानं वाढून ३६ डॉलरच्या वर बंद झाली. १० वर्षांच्या अमेरिकन बाँड यील्डमध्येही दोन महिन्यांतील नीचांकी ४.२५ टक्क्यांच्या खाली घसरण झाली असून, गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थानांचा शोध घेतल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :शेअर बाजार