Join us

Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 09:58 IST

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर बाजारात रेड झोनमध्ये व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ८२ अंकांनी वधारून ८०,३७० वर उघडला.

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर बाजारात रेड झोनमध्ये व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ८२ अंकांनी वधारून ८०,३७० वर उघडला. निफ्टी ७ अंकांनी वधारून २४,३४ वर पोहोचला. बँक निफ्टी ९ अंकांनी घसरून ५५,३८२ वर उघडला. तर, रुपया ८५.२६ च्या तुलनेत ८५.१६/डॉलरवर उघडला. स्मॉल कॅप निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. दुसरीकडे, सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर ऑटो आणि पीएसयू बँकांमध्ये जोरदार विक्री दिसून आली. तर रियल्टी क्षेत्रात आज खरेदीचं चांगलं वातावरण पाहायला मिळाले. त्याचबरोबर फार्मा, आयटी आणि एफएमसीजी हे क्षेत्रही खरेदीदारांच्या पसंतीचे क्षेत्र असल्याचं दिसून आले

कामकाजादरम्यान, पॉवरग्रिड, सनफार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर स्टेट बँक, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली.

'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार कराराबाबत विश्वास व्यक्त केलाय. लवकरच दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आलं. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज सलग सहाव्या दिवशी ३०० अंकांनी वधारला, हे नऊ महिन्यांत प्रथमच घडलंय. तर नॅसडॅकही १०० अंकांच्या तेजीसह बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजार