Stock Markets Today: मंगळवारी (२३ सप्टेंबर) निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरीमुळे शेअर बाजारात सुस्त सुरुवात झाली. निफ्टी ३० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्येही ५० अंकांची वाढ दिसून आली. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स १२ अंकांनी घसरून ८२,१४७ वर उघडला. निफ्टी ७ अंकांनी वाढून २५,२०९ वर उघडला. बँक निफ्टी ३६ अंकांनी घसरून ५५,२४८ वर उघडला आणि चलन बाजारात रुपया १० पैशांनी कमजोर होऊन ८८.३९/ डॉलर्सवर उघडला.
ऑटो इंडेक्समध्ये जवळपास दीड टक्क्यांची वाढ दिसून आली. आयटी इंडेक्समध्येही आज खरेदी होती. याव्यतिरिक्त, इतर सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये घसरण दिसली. रियल्टी, पीएसयू बँक, मेटल, फार्मा यांसारख्या इंडेक्समध्ये घसरण झाली. निफ्टीवर Maruti, M&M, Eicher Motors, Tata Motors, Hero MotoCorp, Bajaj Auto, JSW Steel हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर Ultratech Cement, HDFC Life, Asian Paint, Sun Pharma, Adani Ports, Tat Consumer हे शेअर्स निफ्टीच्या सर्वाधिक घसरणाऱ्या शेअर्सपैकी होते.
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
सोन्या-चांदीचाही उच्चांक
आजचा दिवस अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटनांमुळे प्रभावित होणार आहे. एका बाजूला, अमेरिकन बाजारपेठांमध्ये विक्रमी वाढ सुरू आहे, तर सोनं-चांदीनंही नवीन उच्चांक गाठले आहेत. दुसऱ्या बाजूला, देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित सकारात्मक बातम्या आणि FII-DII च्या हालचाली बाजाराची दिशा ठरवतील.
अमेरिकन बाजारांमध्ये नवीन उच्चांक
अमेरिकन इंडेक्स सातत्याने नवीन उच्चांक गाठत आहेत. डाऊ जोन्स जवळपास ७० अंकांनी वाढून चौथ्या दिवशी नवीन उच्चांकावर पोहोचला. Nvidia च्या मजबूत कामगिरीमुळे Nasdaq 150 अंकांनी वाढून विक्रमी पातळीवर बंद झाला, तर S&P नेही नवीन उच्चांक बनवला. मात्र, आज GIFT निफ्टी २५,२७५ च्या जवळ फ्लॅट आहे आणि डाऊ फ्यूचर्समध्ये सुस्ती दिसत आहे. जपानचा बाजार आज बंद राहणार असून, गुंतवणूकदारांची नजर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणावर असेल.