Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजार वधारला! सेन्सेक्स ७९,००० पार, तर निफ्टी २४,५०० च्या वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:34 IST

आठवड्याच्या सगल दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी!

Share Market Today 21 April: भारतीय शेअर बाजाराची मंगळवारीही(दि.२१) दणक्यात सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात सोन्सेक्स ४९५ अंकांनी वाढून ७९,०१५ वर पोहोचला, तर निफ्टी-50 ने १०० अंकांची झेप घेत २४,५०० चा टप्पा ओलांडला. एनएसईवरदेखील सुमारे २,२४१ शेअर्स हिरव्या निशाणावर होते, तर ६२७ शेअर्स घसरणीत होते. याशिवाय १०० शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले, तर ७१ शेअर्समध्ये अपर सर्किट लागले.

टॉप गेनर्स आणि लूजर्स

सेन्सेक्समधील प्रमुख वाढणाऱ्या शेअर्समध्ये एक्सिस बँक (१.३५% वाढ), अदानी पोर्ट्स (१.२१% वाढ), तसेच एशियन पेंट्स, इंडिगो, ICICI बँक आणि HDFC बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे आयटी क्षेत्रात दबाव दिसून आला. इन्फोसिस, टेक महिंद्रा, HCL, TCS, रिलायन्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स घसरणीत होते.

जागतिक संकेतांचा प्रभाव

आशियाई बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते. जपानचा Nikkei 225 ०.५२% वाढला, तर दक्षिण कोरियाचा KOSPI १.५८% वधारला. हाँगकाँगचा हँग सेंगही सकारात्मक संकेत देत होता. मात्र, अमेरिकन बाजारात सौम्य घसरण झाली. डाऊ जोन्स स्थिर राहिला, तर S&P 500 आणि Nasdaq Composite मध्ये किरकोळ घट झाली.

तेलाची किंमत घसरली

अमेरिका-इराण शांतता चर्चेमुळे तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड सुमारे १% घसरून ९४.५३ डॉलर प्रति बॅरलवर आले, तर WTI क्रूड ८८ डॉलरच्या आसपास आहे. दरम्यान, सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या असून स्पॉट गोल्ड ४,८२० डॉलर प्रति औंसच्या आसपास व्यवहार करत आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Soars! Sensex Crosses 79,000, Nifty Above 24,500

Web Summary : Indian stock market surged with Sensex surpassing 79,000 and Nifty exceeding 24,500. Top gainers included Axis Bank and Adani Ports, while IT stocks faced pressure. Asian markets showed positive trends, contrasting with slight dips in US markets. Oil prices declined due to peace talks.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक