Stock Market Today 19 May : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवशी, म्हणजेच मंगळवारी(दि.१९) शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. बीएसईचा सेन्सेक्स १२६ अंकांच्या वाढीसह ७५,४४१ वर उघडला, तर एनएसईचा निफ्टी २५ अंकांनी वाढून २३,६७५ वर व्यवहार सुरू करण्यात यशस्वी ठरला.
मात्र जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र संकेत आणि अमेरिका-इराण संघर्षविरामाची शक्यता यामुळे बाजारात मोठी तेजी दिसण्याची शक्यता मर्यादित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गिफ्ट निफ्टीने दिले संमिश्र संकेत
बाजारातील ट्रेंडनुसार, गिफ्ट निफ्टी २३,६७४ च्या पातळीवर व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद पातळीपेक्षा सुमारे १६ अंकांनी अधिक आहे. यामुळे भारतीय बाजारात सुरुवातीला मर्यादित वाढ किंवा स्थिर व्यवहार होण्याचे संकेत मिळत आहेत.
सेन्सेक्ससाठी ‘७५ हजार’ महत्त्वाचा टप्पा
कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांच्या मते, ७५,००० ही पातळी सेन्सेक्ससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सेन्सेक्स ७५,००० च्या वर टिकून राहिला, तर तेजी कायम राहू शकते. पुढील लक्ष्य ७५,५०० ते ७५,८०० दरम्यान असू शकते, मात्र सेन्सेक्स ७५,००० च्या खाली गेल्यास, तो ७४,२०० ते ७४,००० या पातळीपर्यंत घसरू शकतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, बाजार तज्ज्ञ मयंक जैन यांनीही सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, ७४,१८० ही महत्त्वाची सपोर्ट लेव्हल आहे. जर ७४,००० ची पातळी तुटली, तर सेन्सेक्स ७३,५०० पर्यंत घसरू शकतो. तर तेजी टिकवण्यासाठी ७६,५०० ची पातळी पार करणे मोठे आव्हान ठरणार आहे
निफ्टीची पुढील दिशा काय?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांच्या मते, सध्या निफ्टी २३,२०० ते २३,८०० या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. त्यांच्या अंदाजानुसार, निफ्टीमध्ये वाढ कायम राहिल्यास तो २३,८०० ते २३,८५० पर्यंत पोहोचू शकतो.
जागतिक घडामोडींवर बाजाराची नजर
सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिका-इराण संबंध, जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींकडे लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थितीत स्थिरता राहिल्यास भारतीय बाजारात पुढील काही सत्रांमध्ये सकारात्मक वातावरण कायम राहू शकते.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी अर्थतज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : Indian stock market started positively. Sensex rose by 126 points to 75,441, and Nifty reached 23,675. Mixed global cues and US-Iran situation may limit gains. Experts advise caution, noting key support and resistance levels.
Web Summary : भारतीय शेयर बाजार की शुरुआत सकारात्मक रही। सेंसेक्स 126 अंक बढ़कर 75,441 पर, और निफ्टी 23,675 पर पहुंचा। वैश्विक संकेतों और अमेरिका-ईरान स्थिति से लाभ सीमित हो सकता है। विशेषज्ञों ने सावधानी बरतने की सलाह दी है।