Join us

Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:07 IST

Stock Market Today: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ६०० अंकांच्या वाढीसह उघडला. सेन्सेक्स ६३८ अंकांनी वधारून ८२,५३४ वर उघडला.

Stock Market Today: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ६०० अंकांच्या वाढीसह उघडला. सेन्सेक्स ६३८ अंकांनी वधारून ८२,५३४ वर उघडला. तर निफ्टी २०८ अंकांनी वधारून २५,१७९ वर पोहोचला. बँक निफ्टी ४७० अंकांनी वधारून ५६,५२९ वर पोहोचला. रुपया ८६.७५ च्या तुलनेत ८६.११ प्रति डॉलरवर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचे व्यवहार दिसून आले. निफ्टी, ऑटो, आयटी, मेटल, फार्मा आणि पीएसयू बँकेसह सर्व निर्देशांक एक टक्क्यांपेक्षा जास्त तेजीसह व्यवहार करत आहेत.

कामकाजादरम्यान अदानी पोर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, एसबीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधित तेजी दिसून आली. तर बीईएल आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब

तेजीचं कारण काय?

मध्यपूर्वेत १२ दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतर दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे. येत्या काही तासांत युद्ध पूर्णपणे संपुष्टात येईल, असा दावा त्यांनी केला. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही अटींसह शस्त्रसंधीला मंजुरी दिली आहे. या घडामोडीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड उत्साह दिसून आला.

शस्त्रसंधीचं वृत्त समोर येताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. काल रात्रीपासून ब्रेंट क्रूडच्या किंमतीत १३ टक्क्यांची घसरण झाली आहे. ते ७७ डॉलर प्रति बॅरलवरून ६७ डॉलरवर आलं. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. याचं कारण म्हणजे इराणकडून होणाऱ्या तेलपुरवठ्यात कोणताही अडथळा आलेला नाही.

टॅग्स :शेअर बाजार