Join us

Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:41 IST

Stock Market Today: महागाईच्या आघाडीवर आलेल्या खुशखबरीनं आज बाजारात उत्साह दिसून आला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी प्रॉफिट बुकिंग नंतर आज बाजार पुन्हा ग्रीन झोनमध्ये उघडला.

Stock Market Today: महागाईच्या आघाडीवर आलेल्या खुशखबरीनं आज बाजारात उत्साह दिसून आला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी प्रॉफिट बुकिंग नंतर आज बाजार पुन्हा ग्रीन झोनमध्ये उघडला. सेन्सेक्स १३० अंकांनी वधारून ८१,२७८ वर उघडला. निफ्टी ३५ अंकांनी वधारून २४,६१३ वर पोहोचला. बँक निफ्टी ६८ अंकांनी वधारून ५५,००८ वर पोहोचला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आयटी आणि मेटलमध्ये आज तेजी दिसून आली. तर ओपनिंगला ऑटो आणि फार्मा क्षेत्रात विक्री होताना दिसली.

कामकाजादरम्यान टाटा स्टील, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?

या बातमीनं बाजाराचा मूड बदलला

देशातील आणि परदेशातील अशा दोन्ही आघाड्यांवर महागाईपासून दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. भारतातील किरकोळ महागाई (सीपीआय) एप्रिलमध्ये ३.१६ टक्क्यांवर आली आहे, जी गेल्या सहा वर्षांतील नीचांकी पातळी आहे. सीपीआय सलग सहाव्या महिन्यात घसरला असून एप्रिलमध्ये १८ बेसिस पॉईंट्सनं घसरला आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी हे सकारात्मक लक्षण असून ग्राहकांची खर्च क्षमता वाढू शकते. अमेरिकेतील महागाईही कमी झाली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर २.३ टक्के होता, जो २.४ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. हा आकडा गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे. या घसरणीनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर व्याजदरात कपात करण्यासाठी दबाव वाढवला आहे.

बाजाराच्या आघाडीवर महागाई कमी झाली असली तरी अमेरिकी बाजारात संमिश्र कल दिसून आला. डाऊ जोन्स २७० अंकांच्या घसरणीसह दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, तर नॅसडॅक ३०० अंकांनी वधारत दमदार कामगिरी करताना दिसला. याउलट गिफ्ट निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह २४,७५० च्या आसपास व्यवहार करत होता, तर डाऊ फ्युचर्स सध्या फ्लॅट दिसत होता. जपानचा निक्केई निर्देशांक २५० अंकांनी घसरला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक