Join us

Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; ऑटो-फार्मा क्षेत्रात मोठी विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:07 IST

आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजाराने तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात बाजार १ टक्क्यांहून अधिक घसरला होता. ...

आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजाराने तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात बाजार १ टक्क्यांहून अधिक घसरला होता. एकीकडे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जग तणावग्रस्त आहे. त्याच वेळी, त्याचा भारतीय बाजारावर होणारा परिणाम आता हळूहळू कमी होत आहे. कामकाजादरम्यान, सेन्सेक्स ७३ अंकांनी मजबूत होऊन ८१,८६९ वर उघडला. निफ्टी ३१ अंकांनी वाढून २४,९७७ वर उघडला. बँक निफ्टी देखील ३१ अंकांनी वाढून ५५,९७५ वर उघडला. मात्र यानंतर त्यात विक्रीचा सपाटा वाढला आणि घसरण झाली.

कामकाजादरम्यान एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्स यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर टिसीएस, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टाटा स्टील, रिलायन्स यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. कामकाजाच्या सुरुवातील ऑटो आणि फार्मा क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला.

"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट

मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण

मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इस्रायल आणि इराणमधील वाढत्या हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. इस्रायलनं इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलला लक्ष्य केलं, प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या संघर्षाचा जागतिक बाजारपेठांवर खोलवर परिणाम झाला आहे. या तणावामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना G7 परिषद अर्ध्यावरच सोडावी लागली. 

त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून तेहरान ताबडतोब रिकामं करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच अणुकराराबद्दल इराणवर दबावही आणला जात आहे. त्याचा बाजारांवर परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे गिफ्ट निफ्टी २५,००० च्या जवळ स्थिर होता, तर डाऊ फ्युचर्स १७५ अंकांनी घसरला. तथापि, निक्कीने १५० अंकांची मजल नोंदवली.

टॅग्स :शेअर बाजार