Join us

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:28 IST

Stock Market Today: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ८१,२१४ वर खुला झाला.

Stock Market Today: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ८१,२१४ वर खुला झाला. तर निफ्टी ८१ अंकांनी घसरून २४,६६९ वर खुला झाला. बँक निफ्टी १५१ अंकांनी घसरून ५५,५९८ वर बंद झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आज आयटी आणि मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर ते फ्लॅट ट्रेडिंग करताना दिसले. फार्मा, पीएसयू बँक आणि हेल्थकेअर सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

कामकाजादरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, एसबीआय बँक आणि नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर एचसीएल टेक, एल अँड टी, रिलायन्स, इन्फोसिस आणि एचडीएफसीच्या शेअरमध्ये घसरण झाली.

या आठवड्यात देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये जीडीपी वाढीपासून ते जीएसटी संकलन, टॅरिफ धोरण आणि कंपन्यांची कामगिरी यांचा समावेश आहे. चौथ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ६.७% वाढ अपेक्षित असताना, प्रत्यक्षात वाढ ७.४% होती. यावरून देशाची आर्थिक स्थिती वेगानं मजबूत होत असल्याचं दिसून येतं. यासोबतच, सरकारनं २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४.८% चं वित्तीय तूट लक्ष्य देखील साध्य केलंय.

शेअर बाजारातील हालचाल

अमेरिकेतील बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरले आणि सुमारे ३६५ अंकांच्या रिकव्हरींतर ५० अंकांनी वाढून बंद झाले. दुसरीकडे, नॅस्डॅक २७० अंकांनी सावरला पण ६० अंकांनी खाली राहिला. गिफ्ट निफ्टी २४,८५० वर स्थिर होता. डाऊ फ्युचर्स १२० अंकांनी घसरला आणि निक्केई ५५० अंकांनी खाली आला. युक्रेननं सुमारे ४० रशियन लष्करी विमानांवर ड्रोननं हल्ला केला. यानंतर, कच्च्या तेलाच्या किंमतीत २% वाढ होऊन ते प्रति बॅरल ६४ डॉलर्सवर पोहोचलं. सोनं १५ डॉलर्सनं वाढून ३,३३० डॉल्सवर पोहोचलं.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार