Join us

Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:23 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान शुक्रवारी (९ मे) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजार खालच्या पातळीवरून झपाट्यानं सावरताना दिसला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान शुक्रवारी (९ मे) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजार खालच्या पातळीवरून झपाट्यानं सावरताना दिसला. सेन्सेक्स ८०० अंकांच्या घसरणीसह उघडला. त्याचबरोबर निफ्टीही २०० अंकांच्या घसरणीसह उघडला, पण त्यात पुन्हा सुधारणा दिसून आली. निफ्टी १८९ अंकांच्या घसरणीसह २४,०८६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. बँक निफ्टीही खालच्या स्तरावरून सुमारे ४०० अंकांनी सांभाळला. मिडकॅप निर्देशांकही खालच्या पातळीवरून ७०० अंकांनी वधारला.

सुरुवातीचे आकडे पाहिले तर शेअर बाजाराची सुरुवात मागील बंदच्या तुलनेत मोठ्या घसरणीनं झाली. सेन्सेक्स १३६६ अंकांनी घसरून ७८,९६८ वर उघडला. निफ्टी ३३८ अंकांनी घसरून २३,९३५ वर आणि बँक निफ्टी ७७० अंकांनी घसरून ५३,५९५ वर उघडला. तर, चलन बाजारात रुपया १० पैशांनी घसरून ८५.८१/डॉलरवर बंद झाला.

अमेरिकेच्या बाजारात काल डाऊ जोन्स जवळपास २५४ अंकांनी वधारला. अमेरिका-ब्रिटन व्यापार करारानंतर अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाले. पारस्परिक शुल्क जाहीर झाल्यानंतर करार करणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. ब्रिटनचा १०% बेसलाइन टॅरिफ लागू राहील. आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर नजर ठेवली जात आहे. अमेरिका आणि चीनच्या अर्थमंत्र्यांची आठवड्याच्या शेवटी स्वित्झर्लंडमध्ये बैठक होणार आहे.

टॅग्स :शेअर बाजार