Join us

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी २३,७०० च्या वर; BPCL, ONGC, Coal India मध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:00 IST

Stock Market Today:  देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (५ फेब्रुवारी) तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ७८,७३५ च्या उच्चांकी पातळीवर गेला. पण त्यानंतर त्यात थोडा संमिश्र ट्रेंड दिसून आला.

Stock Market Today:  देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (५ फेब्रुवारी) तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ७८,७३५ च्या उच्चांकी पातळीवर गेला. पण त्यानंतर त्यात थोडा संमिश्र ट्रेंड दिसून आला. निफ्टी २३,८०७ च्या उच्चांकी पातळीवर गेला, परंतु त्यानंतर तो देखील नंतर २३,७७१ च्या आसपास व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली आणि तो ५०,४१० च्या उच्चांकी पातळीवर गेला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही तेजी दिसून आली.

निफ्टीवर बीपीसीएल, ओएनजीसी, श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, हिंडाल्को यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर एशियन पेंट, नेस्ले इंडिया, टायटन, टाटा कन्झ्युमर, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. ओपनिंगमध्ये सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारून ७८,७४ वर उघडला. निफ्टी ६२ अंकांनी वधारून २३,८०१ वर उघडला. बँक निफ्टी २४५ अंकांनी वधारून ५०,४०२ वर उघडला आणि चलन बाजारात रुपया ५ पैशांनी घसरून ८७.१२/डॉलरवर आला

२ दिवसांनंतर चांगला परतावा

ट्रेड वॉरची चिंता आणि चांगल्या निकालांच्या जोरावर अमेरिकन बाजारात २ दिवसांनंतर चांगला परतावा दिसून आला. डाऊ जवळपास १५० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक २५० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. सकाळी गिफ्ट निफ्टी ७० अंकांनी वधारून २३,८५० च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते आणि निक्केई ७५ अंकांनी वधारला.

२ जानेवारीनंतर प्रथमच एफआयआयनं रोखीनं खरेदी केली, देशांतर्गत फंडांनी सलग ३५ ट्रेडिंग सत्रांमध्ये खरेदी केल्यानंतर काल ४०० कोटी रुपयांच्या छोट्या रकमेची विक्री केली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक