Join us

युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:52 IST

Stock Market Today: जागतिक बाजारपेठेत सातत्यानं तणाव वाढताना दिसतोय. इस्रायल आणि इराणमधील हल्ले सलग सातव्या दिवशीही सुरू आहेत. अशा परिस्थितीत आज शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली.

Stock Market Today: जागतिक बाजारपेठेत सातत्यानं तणाव वाढताना दिसतोय. इस्रायल आणि इराणमधील हल्ले सलग सातव्या दिवशीही सुरू आहेत. अशा परिस्थितीत आज शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स १४० अंकांनी घसरला. निफ्टीमध्येही ४० अंकांनी घसरण झाली. बँक निफ्टी सुमारे १२० अंकांनी घसरला. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला. चलन बाजारात, रुपया ५ पैशांनी कमकुवत होऊन ८६.५३/ डॉलर्स वर उघडला.

आज निफ्टीमध्ये टायटन, आयशर मोटर्स, एम अँड एम, श्रीराम फायनान्स, ग्रासिम, कोटक बँक हे सर्वाधिक वधारलेले शेअर होते. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस हे सर्वात जास्त तोट्यात होते. समोर आलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे, आता फक्त अंतिम आदेशाची वाट पाहिली जात आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इराणी सर्वोच्च नेते खामेनीई यांनी आपण शरणागती पत्करणार नसल्याचं म्हटलंय. उलट, त्यांनी अमेरिकेनं हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिला.

पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये? 

दुसरीकडे, काल अमेरिकन फेडनं कोणताही बदल न करता व्याजदर स्थिर ठेवले. वाढत्या महागाई आणि विकासदरात मंदावण्याची अपेक्षा असूनही, या वर्षी दोन वेळा दर कपात अपेक्षित होती. फेड धोरणानंतर, डाउ सुमारे ५० अंकांनी बंद झाला, दिवसाच्या उच्चांकापासून ३२५ अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक २५ अंकांनी वधारला. अमेरिकन बाजार आज बंद राहणार आहेत. गिफ्ट निफ्टी सुमारे ७५ अंकांनी घसरला आणि २४७५० च्या जवळ होता. डाउ फ्युचर्स १०० अंकांनी कमकुवत होते. निक्केई ३०० अंकांनी घसरला,

टॅग्स :शेअर बाजार