Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर आरबीआय एमपीसीची घोषणा असणार आहे. तत्पूर्वी बाजारात अतिशय मंद सुरुवात झाली होती आणि बेंचमार्क निर्देशांक किरकोळ घसरणीसह रेड झोनमध्ये आले. सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १४ अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी ६५ अंकांनी घसरला होता.
रिझर्व्ह बँक आज सकाळी १० वाजता पतधोरणात व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञांनी ५० बेसिस पॉईंट्स व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. एकाच दिवशी खरेदी केल्यानंतर एफआयआयनं काल पुन्हा सुमारे १४०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे, त्यानंतर सलग तेराव्या दिवशी खरेदीच्या तेराव्या दिवशी देशांतर्गत फंडांनी सुमारे २४०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
आजच्या मे महिन्याच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी डाऊ फ्युचर्स ११० अंकांनी तर निक्केई २०० अंकांनी वधारला होता. अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन बाजार काल घसरणीसह बंद झाले. टेस्लामुळे डाऊ १०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १५० अंकांनी घसरला.
आजचे महत्त्वाचे ट्रिगर
- पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात ०.२५ टक्के कपात होण्याची शक्यता : सर्वेक्षण
- एफआयआयची निव्वळ विक्री १३८८ कोटी, डीआयआयची १३ व्या दिवशीही खरेदी सुरूच
- जागतिक स्तरावर चांदी १३ वर्षांतील उच्चांकी पातळीवर, क्रूड ६५ डॉलरच्या पुढे
- व्यापार कराराबाबत ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा
- बजाज फिनसर्व्हमध्ये ४७५० कोटींचा ब्लॉक डील शक्य