Join us

मोदी सरकारच्या सोलर योजनेशी जोडली गेली ही कंपनी, शेअर खरेदीसाठी तुटून पडले लोक; अशी आहे स्टॉकची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:30 IST

10 ऑक्टोबर 2023 रोजी हा शेअर 69.50 रुपयांवर होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे...

शेअर बाजारातील सोलर सोल्युशन्स आणि ईव्ही चार्जर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सर्व्होटेक पॉवर सिस्टिम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली. ही तेजी कंपनीसंदर्भातील एका सकारात्मक बातमीमुळे आली आहे. या बातमीनंतर, मंगळवारच्या व्यवहाराच्या दिवशी, सर्व्होटेक पॉवर सिस्टिम्सचा शेअर 5 टक्क्यांनी वधारून 142.85 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. 10 ऑक्टोबर 2023 रोजी हा शेअर 69.50 रुपयांवर होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. 

काय आहे बातमी? -सर्व्होटेक पॉवर सिस्टिम्स लिमिटेडने 'प्रधानमंत्री-सूर्य घर मुफ्त बिजली' योजनेंतर्गत देशातील 62 डिस्कॉम्ससोबत नावनोंदणी करून आपला विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. कंपनीचे हे धोरणात्मक पाऊल रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्ये सर्व्होटेकचे स्थान मजबूत करते. तसेच, ग्राहकांना कंपनीकडून सोलर सोल्यूशन्स खरेदी करताना सरकारी अनुदानाचा लाभ घेण्यास सक्षम करून त्यांचा थेट फायदाही पोहोचवते.

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला 1.28 कोटी नोंदणी आणि 14 लाख अर्जांसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय, डिस्कॉमसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, असे सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेडच्या अधिकारी सारिका भाटिया यांनी म्हटले आहे. 

असे आहेत तिमाही निकाल -कंपनीने नुकतेच जूनमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जारी केले आहेत. कंपनीचा महसूल ₹79.57 कोटींच्या तुलनेत 41% ने वाढून ₹112 कोटी पोहोचला आहे. एबिटा संदर्भात बोलायचे झाल्यास, 20% ने वधारला आहे. तो ₹7.13 कोटी वरून ₹8.54 कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा ग्रॉस प्रॉफिट 29% ने वाढला आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक