Join us

शेअर बाजारात पाचव्या दिवशी तेजी, सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला; 'या' स्टॉक्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:14 IST

शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स १३६.६५ अंकांनी वधारून ८२,५८१.८६ वर पोहोचला.

शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स १३६.६५ अंकांनी वधारून ८२,५८१.८६ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५४.७५ अंकांनी वधारून २५,१५३.६० अंकांवर पोहोचला. आरबीआयच्या धोरणानंतर शेअर बाजारात तेजी कायम राहिली. 

रेपो दरात कपातीमुळे बँकिंग शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहे. शेअर्सवर नजर टाकली तर अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एल अँड टी, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी आदी शेअर्समध्ये तेजी आहे. त्याचबरोबर टाटा मोटर्स, नेस्ले, टायटन आणि एशियन पेंट्स या शेअर्समध्ये घसरण होत आहे.

गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?

सोमवारी सलग चौथ्या सत्रात स्थानिक शेअर बाजारात तेजी होती. बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक २५६.२२ अंकांनी वधारून ८२,४४५.२१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १००.१५ अंकांनी वधारून २५,१०३.२० वर बंद झाला. चार दिवसांच्या तेजीनंतर निफ्टी ५६० अंकांनी म्हणजेच २.२७ टक्क्यांनी वधारला, तर सेन्सेक्स १,७०६ अंकांनी वधारला. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले, 'फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम आहे. याचं कारण म्हणजे आरबीआयचा पॉलिसी रेट आणि सीआरआरमध्ये झालेली कपात. या उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून नजीकच्या ते मध्यम कालावधीत विशेषत: मिडकॅपमध्ये तरलता वाढण्याची अपेक्षा आहे."

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक