Stock Market Rise Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. BSE Sensex ९१८.६० अंकांनी (१.२०%) वाढून ७७,५५०.२५ वर बंद झाला, तर Nifty 50 १.१६ टक्क्यांच्या वाढीसह २४,०५०.६० वर स्थिरावला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ₹५ लाख कोटींची भर पडली.
बाजारातील या उसळीमागे अनेक सकारात्मक घटक कारणीभूत ठरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्याने आयात खर्च कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड सुमारे ९७ डॉलर, तर WTI क्रूड ९८ डॉलरच्या आसपास आहे. याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही सुधारणा झाली असून सध्या १ डॉलरचा दर ₹९२.४५ इतका आहे. काही दिवसांपूर्वी युद्धजन्य परिस्थितीमुळे रुपया ₹९५ च्या पातळीवर गेला होता.
दरम्यान, जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत मिळाले. जपानचा Nikkei, दक्षिण कोरियाचा Kospi, चीनचा Shanghai आणि हॉंगकॉंग बाजारात वाढ नोंदवली गेली, ज्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. तसेच इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामामुळे जागतिक तणाव कमी होईल, अशी अपेक्षा असून गुंतवणूकदारांनी खरेदीकडे कल दर्शवला.
सेक्टरनिहाय पाहता, ऑटो आणि PSU बँकिंग शेअर्समध्ये १.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली, तर IT क्षेत्रात १ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास आगामी काळात बाजारातील तेजी कायम राहू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market witnessed a significant rally, with Sensex closing at 77,550. Investor wealth increased by ₹5 lakh crore. Factors included falling crude oil prices, a stronger rupee, and positive global cues. Auto and PSU banking sectors led gains.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में जोरदार तेजी देखी गई, सेंसेक्स 77,550 पर बंद हुआ। निवेशकों की संपत्ति में ₹5 लाख करोड़ की वृद्धि हुई। कच्चे तेल की कीमतों में गिरावट, रुपये में मजबूती और सकारात्मक वैश्विक संकेतों का योगदान रहा। ऑटो और पीएसयू बैंकिंग क्षेत्र में तेजी रही।