Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची 'बंपर' रिकव्हरी! आयटी शेअर्समध्ये तुफान खरेदी; निफ्टी पुन्हा २२,७०० च्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:35 IST

Share Market Recovery : गुरुवार, २ एप्रिल रोजी दुपारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारांमध्ये जोरदार सुधारणा दिसून आली. सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून १९०० अंशांची उसळी घेत सकारात्मक क्षेत्रात प्रवेश केला, तर निफ्टीने पुन्हा २२,७०० ची पातळी गाठली.

Stock Market Recovery : आज सकाळच्या सत्रात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे हाहाकार माजलेल्या दलाल स्ट्रीटवर दुपारनंतर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सकाळी १९०० हून अधिक अंकांनी कोसळलेला सेन्सेक्स खालच्या पातळीवरून पुन्हा उसळला आणि त्याने हिरव्या निशाणात प्रवेश केला. निफ्टीनेही पुन्हा २२,७०० ची महत्त्वाची पातळी गाठली असून, या 'मिरॅकल रिकव्हरी'मुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बाजारातील आजची 'रॉकेट' उसळीदुपारी ३:१५ च्या सुमारास बाजाराची स्थिती खालीलप्रमाणे होती.सेन्सेक्स : ३१४.५६ अंकांच्या (०.४३%) वाढीसह ७३,४४८.८८ वर व्यवहार करत होता. सकाळी हाच इंडेक्स ७१,५४५ पर्यंत खाली घसरला होता.निफ्टी ५० : ८०.१५ अंकांच्या वाढीसह २२,७५९.५५ वर पोहोचला. सत्रादरम्यान निफ्टी २२,२०० च्याही खाली गेला होता.

बाजाराच्या या 'कमबॅक'ची ३ प्रमुख कारणे१. खालच्या स्तरावर जोरदार खरेदीसकाळी बाजार २ टक्क्यांहून अधिक पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी स्वस्त झालेल्या शेअर्समध्ये 'व्हॅल्यू बाइंग' सुरू केली. आयटी क्षेत्राचा पुढाकार: निफ्टी आयटी इंडेक्समध्ये १.७६% ची मोठी वाढ झाली. यामध्ये कोफोर्ज (३%), एलटीआयमाईंडट्री (२%) आणि पर्सिस्टंट सिस्टिम्स (२%) यांसारख्या शेअर्सनी तेजीचे नेतृत्व केले.

२. रुपयाची १२ वर्षांतील ऐतिहासिक झेपभारतीय रुपयाने आज डॉलरच्या तुलनेत सुमारे २% ची मोठी उसळी घेतली आणि तो ९२.८७ च्या स्तरावर पोहोचला. सप्टेंबर २०१३ नंतरची ही रुपयाची सर्वात मोठी एका दिवसातील वाढ आहे.आरबीआयची 'फिल्डिंग': रिझर्व्ह बँकेने सट्टेबाजी रोखण्यासाठी परदेशी डेरिव्हेटिव्ह्जवर कडक निर्बंध लादल्याने रुपयाला बळ मिळाले. जेव्हा शेजारील देशांची चलने कमकुवत होत होती, तेव्हा रुपयाने मात्र मजबूती दाखवून बाजाराला सावरले.

३. तांत्रिक कारणेतांत्रिक विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत निफ्टी २२,२२० च्या वर टिकून आहे, तोपर्यंत गुंतवणूकदार 'लॉन्ग पोझिशन' कायम ठेवू शकतात. आज निफ्टीने याच स्तरावरून शानदार रिव्हर्सल दाखवले आहे.

वाचा - ५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Investors' bumper recovery! IT shares surge, Nifty crosses 22,700 again.

Web Summary : Dramatic market recovery after Trump's statement. Sensex rebounded, Nifty surpassed 22,700. IT sector led the surge with value buying, rupee strengthened due to RBI actions, and technical levels held, boosting investor confidence.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी