Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात 'ट्रम्प' कार्ड चाललं! सेन्सेक्स १३७२ अंकांनी उसळला, निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:02 IST

Stock Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली.

Stock Market : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या छायेत असलेल्या भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार पुनरागमन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'पुढील ५ दिवस इराणवर हल्ला करणार नाही', असे जाहीर करताच जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही खरेदीचा उत्साह संचारला. सोमवारी झालेल्या भीषण पडझडीनंतर, आज सेन्सेक्स आणि निफ्टीने सुमारे २ टक्क्यांची भरारी घेत गुंतवणूकदारांचे नुकसान भरून काढले.

बाजाराची आजची कामगिरीबीएसई सेन्सेक्स : १३७२.०६ अंकांच्या (१.८९%) वाढीसह ७४,०६८.४५ वर बंद झाला.एनएसई निफ्टी ५० : ३९९.७५ अंकांच्या (१.७८%) तेजीसह २२,९५७.८० वर स्थिरावला.सोमवारची स्थिती : काल सेन्सेक्स १८३६ अंकांनी, तर निफ्टी ६०१ अंकांनी कोसळला होता. आजच्या रिकव्हरीमुळे बाजाराने पुन्हा एकदा २३,००० चा टप्पा गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

शेअर्सचा लेखाजोखा: ३० पैकी २९ शेअर्स 'हिरवे'आजच्या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांचे शेअर्स नफ्यात बंद झाले. केवळ एका शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.आजचे टॉप गेनर्स (तेजीत असलेले शेअर्स): इंडिगो : ५.४१% वाढीसह आघाडीवर.एल अँड टी : ५.३३% तेजी.इटरनल : ४.९४% नफा.एशियन पेंट्स : ४.७७% वाढ.बजाज फायनान्स : ४.६९% तेजी.इतर दिग्गज शेअर्स : अल्ट्राटेक सिमेंट (४.१५%), टेक महिंद्रा (३.४८%), अदानी पोर्ट्स (३.१६%), कोटक बँक (३.०९%) आणि एचडीएफसी बँक (२.८८%) या शेअर्सनीही बाजाराला बळ दिले.

वाचा - सिलेंडर बुकिंगसाठी आता द्यावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे! पाहा BPCL चे १० नवे नियम

आजचे लूजर्स (घसरण झालेले शेअर्स)आजच्या अष्टपैलू तेजीमध्ये केवळ काही शेअर्सना विक्रीचा सामना करावा लागला:पॉवर ग्रिड : १.०३% घसरणीसह सेन्सेक्समधील एकमेव लाल निशाणातील शेअर.निफ्टी ५० : ५० पैकी ४५ शेअर्स वधारले, तर ५ शेअर्समध्ये घसरण झाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Card Boosts Market: Sensex Soars, Nifty Nears 23,000

Web Summary : Trump's statement calmed markets, triggering a strong recovery. Sensex rose by 1372 points, Nifty neared 23,000. Most shares gained, recovering from Monday's losses.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी