Share Market : भारतीय शेअर बाजारात सलग ८ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर आज ब्रेक लागला. बाजाराने बुधवारी, जोरदार उसळीसह नवीन महिन्याची (ऑक्टोबर) दमदार सुरुवात केली. या तेजीला प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयामुळे चालना मिळाली. बीएसई सेन्सेक्स ७१५.६९ अंकांनी मोठ्या वाढीसह ८०,९८३.३१ अंकांवर बंद झाला. याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांक २२५.२० अंकांच्या वाढीसह २४,८३६.३० अंकांवर स्थिरावला.
आरबीआयच्या 'बूस्टर डोस'मुळे बाजारात उत्साहआरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीचे निष्कर्ष जाहीर केले. या सकारात्मक घोषणांचा थेट परिणाम बाजाराच्या भावनांवर दिसून आला.आर्थिक वाढीचा अंदाज वाढला : आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक वाढीचा अंदाज वाढवून ६.८ टक्के केला आहे.महागाईचा अंदाज घटला : किरकोळ महागाईचा अंदाज घटवून २.६ टक्के करण्यात आला आहे.आरबीआयच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आणि बाजारातील घसरण थांबली.
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तुफानी तेजीआजच्या तेजीमध्ये ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर होत्या.सर्वाधिक वाढ : सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स ५.५४ टक्क्यांनी वाढत सर्वात जास्त नफा कमावणारे ठरले.सर्वाधिक घसरण : याउलट, बजाज फायनान्सचे शेअर्स आज १.१० टक्क्यांनी घसरत सर्वाधिक नुकसान देणारे ठरले.
इतर प्रमुख कंपन्यांची कामगिरीबाजारातील उत्साह व्यापक होता; सेन्सेक्समधील ३० पैकी २२ कंपन्यांचे, तर निफ्टी ५० मधील ५० पैकी ३७ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणावर (तेजीसह) बंद झाले.
आज तेजी असलेले प्रमुख शेअर्स | आज घसरण झालेले प्रमुख शेअर्स |
कोटक महिंद्रा बँक: ३.४५% | भारतीय स्टेट बँक : ०.९७% |
ट्रेंट: ३.३१% | अल्ट्राटेक सिमेंट: ०.८६% |
सनफार्मा: २.५८% | टाटा स्टील: ०.७१% |
ॲक्सिस बँक: २.४३% | एशियन पेंट्स: ०.६२% |
ICICI बँक: १.७७% | भारती एअरटेल: ०.४७% |
एचडीएफसी बँक: १.४८% | मारुती सुझुकी: ०.२६% |
रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्येही आज किरकोळ वाढ दिसून आली.
Web Summary : The Indian stock market rebounded after eight days of decline, fueled by the RBI's policy announcements. The BSE Sensex closed with significant gains, as did the NSE Nifty 50. Tata Motors led the gainers, while Bajaj Finance saw the biggest drop.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में आरबीआई की नीति घोषणाओं के बाद आठ दिनों की गिरावट के बाद सुधार हुआ। बीएसई सेंसेक्स और एनएसई निफ्टी 50 दोनों में महत्वपूर्ण बढ़त हुई। टाटा मोटर्स फायदे में रही, जबकि बजाज फाइनेंस में सबसे बड़ी गिरावट देखी गई।