Share Market Today: कालच्या जबरदस्त तेजीनंतर, बुधवारी (४ फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या नफावसुलीनं झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ५०० अंकांनी आणि निफ्टी १२० अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर खालच्या स्तरावरून थोडी सुधारणा दिसून आली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ८० अंकांच्या वाढीसह ८३,८०० च्या आसपास होता, तर निफ्टी ३२ अंकांच्या तेजीसह २५,७६५ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी २०९ अंकांच्या वाढीसह ६०,२४८ वर पोहोचला.
क्षेत्रीय हालचाली
आज आयटी (IT) इंडेक्समध्ये सुरुवातीलाच ५.७ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण झाली. मीडिया, रियल्टी आणि मिड-स्मॉल हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. दुसरीकडे ऑटो, मेटल, ऑइल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये खरेदी दिसून आली.
'या' शेअर्समध्ये चढ-उतार
निफ्टीवरील टॉप लूजर्स : HCL Tech, Infosys, TCS, Tech Mahindra, Wipro, Bajaj Finance, Bajaj Finserv आणि Kotak Mahindra Bank.
निफ्टीवरील टॉप गेनर्स : ONGC, Coal India, M&M, Power Grid, Grasim, ITC आणि Tata Steel.
बाजारावर परिणाम करणारे प्रमुख घटक
आजच्या व्यवहारासाठी 'गिफ्ट निफ्टी'मधून (Gift Nifty) घसरणीचे संकेत मिळाले होते. काल अमेरिकन बाजारात आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे घसरण पाहायला मिळाली. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतचे अपडेट, परकीय गुंतवणूकदारांचं पुनरागमन, अमेरिकन बाजारातील कमकुवतपणा, कमोडिटी बाजारातील तेजी आणि आरबीआयची धोरणात्मक बैठक हे सर्व घटक आज बाजाराची दिशा ठरवू शकतात.
Web Summary : Indian share market opened with profit booking after yesterday's rally. IT stocks saw a significant dip. Nifty traded near 25,780, influenced by global cues and RBI policy meet.
Web Summary : कल की तेजी के बाद भारतीय शेयर बाजार मुनाफावसूली के साथ खुला। आईटी शेयरों में भारी गिरावट देखी गई। निफ्टी 25,780 के करीब कारोबार कर रहा था, जो वैश्विक संकेतों और आरबीआई नीति बैठक से प्रभावित था।