Join us

Share Market New Year 2025 : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सलामी, 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 09:49 IST

Share Market New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली. सेन्सेक्स ९९.३८ अंकांनी वधारून ७८,२५१.७६ वर व्यवहार करत होता.

Share Market New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली. सेन्सेक्स ९९.३८ अंकांनी वधारून ७८,२५१.७६ वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २०.५५ अंकांच्या वाढीसह २३,६६५.३५ वर व्यवहार करत आहे. शेअर्सवर नजर टाकली तर सन फार्मा, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आदी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर नेस्ले, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.

मंगळवारी २०२४ या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स १०९ अंकांनी घसरला होता तर निफ्टी जवळपास स्थिर होता. बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक १०९.१२ अंकांनी घसरून ७८,१३९.०१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निर्देशांक निफ्टी मात्र सुरुवातीच्या घसरणीतून बऱ्याच अंशी सावरण्यात यशस्वी ठरला आणि अखेर ०.१० अंकांच्या घसरणीसह २३,६४४.८० वर बंद झाला.

२०२४ मध्ये संपत्तीत ७७.६६ लाख कोटींची वाढ

२०२४ मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७७.६६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. याच कालावधीत बीएसई सेन्सेक्स ८ टक्क्यांनी वधारला. जगभरात अनिश्चितता असूनही भारतीय बाजारांनी उत्तम नफा दिल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली. यावर्षी ८ एप्रिल रोजी प्रथमच बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं बाजार भांडवल ४०० लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर एफआयआयची विक्री, जागतिक अनिश्चितता आणि वाढती महागाई यामुळे भारतीय बाजारात मोठी घसरण झाली. एकट्या ऑक्टोबरमध्ये बीएसई सेन्सेक्स ४,९१०.७२ अंकांनी म्हणजेच ५.८२ टक्क्यांनी घसरला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक