Join us

Stock Market Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारानं मारला सिक्सर; ४३९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:59 IST

Stock Market Opening: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात बुल रन दिसून आला. सेन्सेक्स जबरदस्त तेजीसह उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४३९ अंकांनी वधारून ७४,६०८ वर उघडला.

Stock Market Opening: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात बुल रन दिसून आला. सेन्सेक्स जबरदस्त तेजीसह उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४३९ अंकांनी वधारून ७४,६०८ वर आणि निफ्टी १५४ अंकांनी वधारून २२,६६२ वर, तर बँक निफ्टी ४३८ अंकांनी वधारून ४८,७९२ वर उघडला. तर रुपया ५ पैशांनी मजबूत होऊन ८६.७५/ डॉलरवर खुला झाला. आज मेटल आणि रियल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक खरेदी पाहायला मिळत आहे. हे दोन्ही क्षेत्र सध्या सुमारे एक टक्का वाढीसह व्यवहार करत आहेत.

या शेअर्समध्ये तेजी/घसरण

कामकाजाच्या सुरुवातीला आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, झोमॅटो, महिंद्रा आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टिसीएस, इन्फोसिस, एचसीएलटेक, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

यंदाच्या आर्थिक वर्षात कर वसुलीच्या आघाडीवर मोठी बातमी समोर आली. प्रत्यक्ष कर संकलन १६ टक्क्यांनी वाढून २५ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. तर, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) कलेक्शनमध्ये ५५ टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे सरकारची महसुली स्थिती मजबूत झाली असून, हे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक लक्षण आहे.

अमेरिकन बाजारात तेजी

अमेरिकेच्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. डाऊ जोन्स ३५० अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर नॅसडॅकमध्येही सुमारे ५० अंकांची तेज दिसून आली. या तेजीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. गिफ्ट निफ्टी १५० अंकांनी मजबूत होऊन २२,७५० च्या पातळीवर पोहोचला. तर जपानचा निक्केई निर्देशांक ५०० अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक