शेअर बाजारात गुरुवारच्या व्यवहारादरम्यान इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचा शेअर फोकसमध्ये होते. आज कंपनीचा शेअर २०% ने वधारून १५९० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. या शेअरचा बुधवारचा बंद भाव १३२७.५५ रुपये एवढा होता. बीएसईवर जवळपास १८.८२ लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली.
हा आकडा दोन आठवड्यांच्या सरासरी उलाढालीपेक्षा (४७,००० शेअर्स) खूपच अधिक आहे. या शेअरची एकूण उलाढाल २७८.९७ कोटी रुपये एवढी होती. याच बरोबर याचे बाजार भांडवल (एम-कॅप) १२,७२२.५१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
तांत्रिक आघाडीवर, एका विश्लेषकाने म्हटले आहे की, नजीकच्या काळात हा शेअर १६०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, काही विश्लेषकांनी १५५० रुपयांच्या पातळीच्यावर जोरदार प्रतिकाराचे संकेत दिले आहेत. तसेच, त्यांपैकी एकाने गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवर नफा वसुलीचा सल्लाही दिला आहे.
बोनान्झाचे तांत्रिक संशोधन विश्लेषक ड्रुमिल विथलानी म्हणाले, "ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने दैनिक चार्टवर चढत्या त्रिकोणी पॅटर्नमधून मजबूत ब्रेकआउट दर्शविला आहे, ज्याला व्हॉल्यूममध्ये जोरदार वाढीसाठी समर्थन आहे, जे अलिकडच्या काही महिन्यांतील सर्वाधिक आहे. मोठ्या वॉल्यूमद्वारे पुष्टी करण्यात आलेला ब्रेकआउट, या निकालाची ताकद आणि विश्वसनीयता मजबूत करतो. अपेक्षित लक्ष्य 1550-1,600 रुपये दरम्यान आहे आणि स्टॉप लॉस 1410 रुपयांवर निर्धारित करण्यात आली आहे."
आनंद राठीचे वरिष्ठ व्यवस्थापक तथा तांत्रिक संशोधन विश्लेषक जिगर एस पटेल म्हणाले, १३५० रुपयांवर समर्थन आणि १,५५५ रुपयांवर तात्काळ प्रतिकार दिसून येऊ शकतो. नजिकच्या काळातील ट्रेडिंग रेंज १,३५० ते १,५५५ रुपयांच्या दरम्यान असेल.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)