Join us
Daily Top 2Weekly Top 5

60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:30 IST

या शेअरचा ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला असून, मार्केट कॅपिटलही ₹ १७,००० कोटींच्या खाली आले आहे.

 सध्या शेअर बाजारात ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या (Ola Electric Mobility) शेअरची अवस्था अत्यंत बिकट आहे. हा शेअर बुधवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी घसरून ₹ ३८.०२ वर बंद झाला. या शेअरचा ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला असून, मार्केट कॅपिटलही ₹ १७,००० कोटींच्या खाली आले आहे.

६०% हून अधिक घसरला - ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर ४ डिसेंबर २०२४ रोजी ₹ १०२.५० होता. जो बुधवारी 3 डिसेंबर 2025 रोजी 38.02 रुपयांवर बंद झाला. गेल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून कंपनीचा शेअर ६० टक्क्यांहून अधिक तुटला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये शेअर्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक, तर सहा महिन्यांत सुमारे २३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर या वर्षात आतापर्यंत ओला इलेक्ट्रिकचा शेअर ५६ टक्क्यांनी घसरला आहे.

IPO च्या तुलनेत जवळपास ५०% ने घसरला -ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा IPO २ ऑगस्ट २०२४ रोजी खुला झाला होता, तेव्हा शेअरची किंमत ₹ ७६ निश्चित करण्यात आली होती. सध्याचा बंद झालेला भाव ₹ ३८.०२ एवढा आहे. अर्थात IPO च्या किमतीच्या तुलनेत कंपनीचा शेअर ५० टक्क्यांनी घसरला आहे. अर्थात, IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या शेअर्सचे मूल्य आता अर्धे झाले आहे. 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा IPO एकूण ४.४५ पट सबस्क्राइब झाला होता. सामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ४.०५ पट बोली लागली होती. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचे शेअर जवळपास फ्लॅट लिस्ट झाले असले तरी, पहिल्याच दिवशी ते ₹ ९१.१८ वर बंद झाले होते. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरूच आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ola Electric Share Plummets: Investors Face Heavy Losses

Web Summary : Ola Electric's share price crashed, falling over 60% from its peak. It closed at ₹38.02, significantly below its IPO price of ₹76, leaving investors facing substantial losses as their investments have halved.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकस्टॉक मार्केट