Join us

Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:41 IST

देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीच्या विकली एक्सपायरीच्या दिवशी पुन्हा एकदा शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले.

देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीच्या विकली एक्सपायरीच्या दिवशी पुन्हा एकदा शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ८१,४७६ वर उघडला. तर निफ्टी ३७ अंकांनी घसरून २४,६०४ वर तर बँक निफ्टी १९० अंकांनी घसरून ५३,२०१ वर उघडला. 

आयटी, मेटल आणि फार्मा निर्देशांक वधारले. याशिवाय आरोग्य सेवा निर्देशांकात तेजी दिसून आली. हे चार निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. निफ्टीवर हिंडाल्को, ओएनजीसी, टेक महिंद्रा, सिप्ला, टीसीएस या शेअरमध्ये तेजी होती. तर अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाइफ, ट्रेंट, बजाज ऑटो, एशियन पेंट मध्ये घसरण झाली.

करन्सी मार्केटमध्ये रुपया १ पैशांनी घसरून ८४.८४ डॉलर्सवर पोहोचला. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. देशांतर्गत बाजारात ट्रेडिंग सुरू असताना जागतिक बाजारात सध्या संमिश्र व्यवसाय पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या बाजारपेठांमध्येही संमिश्र कल दिसून येत आहेत. काल टेक शेअर्सच्या जोरावर नॅसडॅकनं सलग आठव्या दिवशी ३५० अंकांची झेप घेत पहिल्यांदाच २०,००० च्या वर उडी घेतली आणि सलग पाचव्या दिवशी डाऊ १०० अंकांनी घसरून बंद झाला.

फेडच्या व्याजदरात कपातीची शक्यता

अमेरिकेतील अंदाजानुसार, महागाईच्या आकडेवारीनंतर पुढील आठवड्यात फेडच्या धोरणात व्याजदरात कपात होण्याची शक्यता ९९ टक्के तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये सीपीआय २.७ टक्के आणि कोअर सीपीआय ३.३ टक्के होता. सकाळी गिफ्ट निफ्टी 24750 च्या जवळ फ्लॅट होता. डाऊ फ्युचर्स ८० अंकांनी घसरला होता. मात्र, दोन दिवसांच्या सुस्तीनंतर आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांक निक्केईमध्ये ६५० अंकांची उसळी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक