Join us

२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:32 IST

Share Market : दोन दिवसांच्या सलग घसरणीनंतर शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली. यात टाटा समुहाच्या कंपनीचा शेअर्स सर्वाधिक घसरला.

Share Market : आज (शुक्रवारी) भारतीय शेअर बाजारात दिवसभर प्रचंड चढ-उतार दिसून आले. बाजाराने सकाळची सुरुवात चांगली केली, पण नंतर तो अचानक खाली घसरला. मात्र, दुपारनंतर बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि हिरव्या रंगात बंद झाला. आज टाटा समुहातील एका कंपनीला मोठा फटका बसला.

आज बाजार कुठे थांबला?दिवसअखेर, बीएसई सेन्सेक्स १९३.४२ अंकांनी (०.२३%) वाढून ८३,४३२.८९ अंकांवर बंद झाला.एनएसई निफ्टी ५० देखील ५५.७० अंकांनी (०.२२%) वाढून २५,४६१.०० अंकांवर बंद झाला.

कोणते शेअर्स वधारले आणि कोणते घसरले?आज सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर १० कंपन्यांचे शेअर्स घसरले. निफ्टी ५० मधील ५० पैकी ३१ कंपन्यांचे शेअर्स वाढले आणि १९ कंपन्यांचे शेअर्स तोट्यात राहिले.सर्वाधिक वाढ: सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचे शेअर्स १.६० टक्क्यांनी वाढले.सर्वाधिक घट: मात्र, टाटा ग्रुपच्या ट्रेंटचे शेअर्स तब्बल ११.९३ टक्क्यांनी घसरले.

आज वाढलेले प्रमुख शेअर्सइन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एल अँड टी (L&T), बीईएल (BEL), एनटीपीसी, इटरनल, टायटन, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स वधारले.

वाचा - टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!

आज घसरलेले प्रमुख शेअर्सटाटा स्टील, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स आणि सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्स घसरले. एकंदरीत, बाजारात दिवसभर अनिश्चितता असली तरी, अखेरीस तो सकारात्मक पातळीवर बंद झाला, जो गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक गोष्ट आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकनिर्देशांक