Join us

बजेटपूर्वी शेअर बाजाराने टाकली मान! सेन्सेक्स 824 अंकांनी खाली, 'या' 5 कारणांमुळे मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:21 IST

Share Market : अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. या पाठीमागची ५ कारणे समोर आली आहेत.

Share Market : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८२४.२९ अंकांनी घसरुन ७५,३६६.१७ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६३.०५ अंकांनी घसरून २२,८२९.१५ या पातळीवर बंद झाला.

सोमवारच्या व्यवहारात आयसीआयसीआय बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एसबीआय, एमअँडएम आणि एचयूएल निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड कॉर्प आणि भारती एअरटेलला सर्वाधिक नुकसान झाले.

‘डीपसेक’ने उडाली खळबळकमकुवत जागतिक संकेतांमुळे सोमवारी गुंतवणूकदारांचा मूड बिघडला. चायनीज स्टार्टअप DeepSeek ने फ्री आणि ओपन सोर्स AI-मॉडेल लाँच करून तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ माजवली आहे. हे AI-मॉडेल अमेरिकन कंपनी OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देईल. यामुळे अमेरिकेचे शेअर फ्युचर्स आणि बहुतांश आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. मात्र, चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.

 डॉलर आणखी मजबूतडोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे. निर्वासित लोकांना परत घेण्यास नकार दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर २५ टक्के शुल्कासह निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकी डॉलर भक्कम झाला आहे.

अर्थसंकल्पापूर्वी नफा बुकिंगसाधारणपणे अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात वाढ अपेक्षित असते. मात्र, यावेळी अर्थसंकल्पापूर्वी बाजारात अधिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदार नफा बुक करत आहेत.

तिमाही निकालांचा परिणामकंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल आत्तापर्यंत विशेष आश्वासक राहिलेले नाहीत. काही अपवाद सोडले तर तिमाही निकालांनी गुंतवणूकदारांना निराश केलंय.

विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्रीऑक्टोबर महिन्यापासून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) सातत्याने भारतीय शेअर बाजारातील समभागांची विक्री करत आहेत. आतापर्यंत केवळ जानेवारी महिन्यातच त्यांनी सुमारे ६९,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

टॅग्स :अर्थसंकल्प २०२५शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांक