Join us

₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 22:19 IST

हा आयपीओ १४ जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर आज बुधवार, १६ जुलै रोजी बंद झाला. याची किंमत ९६ रुपये एवढी निर्धारित करण्यात आली होती.

स्पनवेब नॉनवोव्हन लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, हा आयपीओ १४२ हून अधिक वेळा सबस्क्राइब झाला. हा आयपीओ १४ जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर आज बुधवार, १६ जुलै रोजी बंद झाला. याची किंमत ९६ रुपये एवढी निर्धारित करण्यात आली होती.

जाणून घ्या सविस्तर - या एसएमई इश्यूला, ४.२२ मिलियन शेअर्स ऑफरच्या तुलनेत ६५१.९६ मिलियन शेअर्ससाठी बोली लागली होती. यामुळे १३०.३ पट सब्सक्रिप्शन झाले. ही मागणी बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs) आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून करण्यात आली होती. त्यांनी आपला रिझर्व्ह हिस्सा अनुक्रमे २१६.८ पट आणि १७०.४२ पट सब्सक्राइब केला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (QIB) भाग ३४.३८ पट सबस्क्राइब झाला.

स्पनवेब नॉनवोव्हन आयपीओ जीएमपी -अनौपचारिक बाजारांवर लक्ष ठेऊन असणाऱ्यांच्या मते, बुधवारी ग्रे मार्केटमध्ये स्पनवेब नॉनवोव्हन्सचे अनलिस्टेड शेअर्स ₹१३९ वर व्यवहार करत होते, जे ₹९० ते ₹९६ च्या मूल्य बँडच्या टॉपच्या तुलनेत ४३ रुपये अथवा ४४.८ टक्के एढ्या प्रीमियमच्या वर होते. महत्वाचे म्हणजे, गुंतवणूकदार किमान २,४०० इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकत होते. तसेच, यानंतर १,२०० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावली जाऊ शकत होती. हा आयपीओ ६३,५१,६०० इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू होता.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार