Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निप्टी २५,९९५ च्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:14 IST

भारतीय शेअर बाजाराने गुरुवार, ४ डिसेंबर रोजी आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग सत्राची सुरुवात घसरणीसह सुरुवात केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, रेड झोनमध्ये उघडले.

भारतीय शेअर बाजाराने गुरुवार, ४ डिसेंबर रोजी आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग सत्राची सुरुवात घसरणीसह सुरुवात केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, रेड झोनमध्ये उघडले. परंतु, काही वेळात दोन्हीमध्ये थोडी तेजी दिसून आली.

३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ११९.२५ अंकांनी किंवा ०.१४ टक्क्यांनी घसरून ८४,९८७.५६ वर खुला झाला, तर एनएसई निफ्टी ५० ४.१५ अंकांनी किंवा ०.०२ टक्क्यांनी घसरून २५,९८१.८५ वर उघडला. सकाळी ९:२२ वाजता, सेन्सेक्स ६७ अंकांनी घसरून ८५,०३९ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ५० ३४ अंकांनी घसरून २५,९५१ वर व्यवहार करत होता.

मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?

बीएसईचे टॉप गेनर्स कोण?

टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा

बीएसईचे सर्वाधिक टॉप लूझर्स कोण?

इटर्नल, टायटन, पॉवरग्रिड आणि आयसीआयसीआय बँक

बुधवारी बाजार कसा होता?

बुधवार, ३ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. दोन्ही प्रमुख बेंचमार्क निर्देशांक रेड झोनमध्ये बंद झाले. सेन्सेक्स ३१.४६ अंकांनी किंवा ०.०४ टक्क्यांनी घसरून ८५,१०६.८१ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० ४६.२० अंकांनी किंवा ०.१८ टक्क्यांनी घसरून २५,९८६.०० वर बंद झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian stock market recovers after initial dip; Sensex gains slightly.

Web Summary : The Indian stock market initially declined but recovered. The Sensex closed with a slight gain of 35 points, while the Nifty surpassed 25,995. TCS and HCL Tech were among the top gainers, while Eternal and Titan faced losses. The previous day saw a market downturn.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक