Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:52 IST

३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक १२.३७ अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी वाढून ८५,१५०.६४ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० २७.३० अंकांनी किंवा ०.१० टक्क्यांनी घसरून २६,००४.९० वर पोहोचला.

Stock Market Today: शेअर बाजाराची बुधवारी ३ डिसेंबर रोजी, आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात फ्लॅट ओपनिंग झाली. बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स ग्रीन झोनमध्ये उघडला आणि एनएसई निफ्टी ५० रेड झोनमध्ये उघडला. परंतु, सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ५० नं सकारात्मक सुरुवात केली होती.

३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक १२.३७ अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी वाढून ८५,१५०.६४ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० २७.३० अंकांनी किंवा ०.१० टक्क्यांनी घसरून २६,००४.९० वर पोहोचला. सकाळी ९:२० वाजता, सेन्सेक्स ६५ अंकांनी वाढून ८५,२०३ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ५० ३ अंकांनी वाढून २६,०३५ पातळीवर व्यवहार करत होता.

Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले

बीएसईमधी टॉप गेनर्स?

टीसीएस, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स, एसबीआयएन

बीएसईचे टॉप लुझर्स

टायटन, ट्रेंट, एनटीपीसी

मंगळवारी कसा होता बाजाराचा मूड?

मंगळवार, २ डिसेंबर रोजी, भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, दोन्ही प्रमुख बेंचमार्क निर्देशांक रेड झोनमध्ये बंद झाले. सेन्सेक्स ५०३.६३ अंकांनी किंवा ०.५९ टक्क्यांनी घसरून ८५,१३८.२७ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० १४३.५५ अंकांनी किंवा ०.५५ टक्क्यांनी घसरून २६,०३२.२० वर बंद झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock market crashes after flat start; Sensex down 160 points.

Web Summary : Indian stock market faced a setback. The Sensex fell by 160 points. Nifty also declined below 25,958 after a flat opening on Wednesday. TCS, Axis Bank gained while Titan and Trent lost.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक